आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kings XI Punjab Vs Kolkata Knight Riders IPL 6 Live

IPL: शेवटच्या चेंडूवर किंग्ज इलेवनचा केकेआरवर रोमांचक विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली- डेथ ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल-6 मध्ये एका रोमांचक लढतीत गजविजेता कोलकाता नाइट रायडर्सला 4 धावांनी पराभूत केले. कोलकाताचा ऑफस्पिनर सुनील नारायणने आयपीएल-6 मध्ये पहिली हॅट्ट्रिक घेऊन किंग्ज इलेव्हनवर दबाव निर्माण केला होता. मात्र, हा दबाव केकेआरचे दिग्गज फलंदाज कायम ठेवू शकले नाहीत. किंग्ज इलेव्हनच्या मनप्रीत गोनीला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. गोनीने (42 धावा) शानदार फलंदाजी करताना पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. यानंतर गोलंदाजीत एक विकेटही घेतली. अझहर मेहमूद (3 विकेट) आणि प्रवीणकुमार (2 विकेट) यांच्या गोलंदाजीनेही विजयात वाटा उचलला.

केकेआरची हाराकिरी
अखेरच्या दोन षटकात सामना अत्यंत रोमांचक झाला होता. युसूफ पठाणने मॅचविनर बनवण्याची संधी गमावली. गेल्या वर्षीपासून फ्लॉप ठरत असलेल्या युसूफने या वेळीही निराश केले. तो 13 धावा काढून प्रवीणच्या गोलंदाजीवर पॅव्हेलियनमध्ये परतला. प्रवीणने अखेरच्या षटकात सेनानायकेला धावबाद करून सामना अधिक रंजक केला. कोलकात्याला अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी 6 धावांची गरज होती. मात्र, तळाचे फलंदाज ‘एका फटक्याचे हीरो’सुद्धा बनू शकले नाही. केकेआरकडून गौतम गंभीरने 60 आणि इयान मोर्गनने 47 धावा काढल्या.

तत्पूर्वी, टॉस जिंकून कोलकता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. किंग्ज इलेव्हनकडून मनप्रीत गोनी (42) आणि मनदीपसिंग (41) यांच्या फलंदाजीने डावाला आकार दिला. कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली. तो अवघ्या 7 धावा काढून बाद झाला. मनन वोहराने 17 आणि डेव्हिड हसीने 12 तर डेव्हिड मिलरने 20 धावा काढल्या.

गोनीची आक्रमक फलंदाजी
गोनीने अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी करून 18 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 42 धावा काढल्या. मनदीपने 30 चेंडंूत 6 चौकारांच्या मदतीने 41 धावांची आकर्षक खेळी केली. गोनी आणि मनदीपशिवाय पंजाबच्या इतर फलंदाजांनी केवळ मैदानावर हजेरी लावण्याचे काम केले.

सुनील नारायणची कमाल
सुनील नारायणने आयपीएल-6 मध्ये पहिली हॅट्ट्रिक घेतली. त्याने 14.4 षटकांत डेव्हिड हसीला यानंतर सलग दोन चेंडूवर अझहर मेहमूद आणि गुरकिरतसिंग यांना बाद केले.

आयपीएलमध्ये दहा हॅट्ट्रिक
2008 : लक्ष्मीपथी बालाजी (सीएसके), अमित मिश्रा (डेअरडेव्हिल्स), मखाया एन्टिनी (सीएसके). 2009 : युवराजसिंग (किंग्ज इलेव्हन), रोहित शर्मा (डेक्कन चार्जर्स), युवराजसिंग (किंग्ज इलेव्हन). 2010 : प्रवीणकुमार (रॉयल चॅलेंजर्स), 2011 : अमित मिश्रा (डेक्कन चार्जर्स), 2012 : अजित चंडिला (राजस्थान रॉयल्स), 2013 : सुनील नारायण (केकेआर). (नोट : अमित मिश्रा आणि युवराजसिंग यांनी दोन वेळा हॅट्ट्रिक घेतली आहे. तीन वेगवान आणि 7 फिरकीपटूच्या नावे हॅट्ट्रिक. मखाया एन्टिनी असा एकमेव गोलंदाज आहे, ज्याच्या तिन्ही विकेट बोल्ड आहेत.)