आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : किंग्ज पंजाबकडून दिल्लीचा पराभव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयपीएल-6 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने मंगळवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 5 गड्यांनी मात केली. डेव्हिड मिलरने नाबाद 34 (39 चेंडू, 3 चौकार) धावा काढून पाहुण्या टीमला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना यजमान दिल्लीने 7 बाद 120 धावा काढल्या होत्या. पंजाबने 17 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. पंजाबचा हा चौथा विजय ठरला.


धावांचा पाठलाग करणा-या पंजाबकडून मनदीप सिंग (24) आणि पोमेरबचने (18) दुस-या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी करून दमदार सुरुवात केली. मर्वेने पोमरबचला बाद करून जोडी फोडली. त्यापाठोपाठ मनदीप बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या मिलरने संघाचा डाव सावरला. त्याने हसीसोबत 40 धावांची भागीदारी करून विजयाचा मार्ग सुकर केला. आशिष नेहराने हसीला (20) झेलबाद केले. अखेर मिल्लरने पीयूष चावलासोबत (5) 11 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.


तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार जयवर्धने (4), मर्वे (8) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर (40), सेहवाग (23) व हसी (20) यांनी डाव सावरून दिल्लीला सन्मानजनक स्कोअर उभारून दिला.
संक्षिप्त धावफलक - दिल्ली - 7 बाद 120 पराभूत वि. पंजाब-5 बाद 121.


हरमीतचे तीन बळी
पंजाबकडून सामनावीर हरमितने 24 धावा देत तीन घेतले. त्याने वीरेंद्र सेहवाग, जुनेजा आणि केदार जाधवला बाद केले. तसेच प्रवीणकुमारने 29 धावांत दोन बळी घेतले. त्याने सलामीवीर जयवर्धने व डेव्हिड वॉर्नरच्या महत्त्वाच्या विकेट काढल्या.