आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kipsang Wins His 2nd London Marathon News In Divya Marathi

लंडन मॅरेथॉन : किपसेंग, किप्लागत मॅरेथॉनचे विजेते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - विश्वविक्रमी विल्सन किपसेंग आणि दोन वेळेसची विश्वविजेती एडना किप्लागत यांनी रविवारी लंडन मॅरेथॉन स्पर्धेत केनियाचे वर्चस्व सिद्ध करताना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावले. इंग्लंडचा 5000 व 10000 मीटरचा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन मो. फराहचे मॅरेथॉनमधील बहुप्रतीक्षित पदार्पण अपेक्षेनुसार ठरले नाही. अखेर त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याच्या अपयशाने इंग्लिश फॅन चांगले निराश झाले.

किपसेंगने दोन तास चार मिनिटे आणि 29 सेकंदांचा नवा कोर्स रेकॉर्ड करताना दुसर्‍यांदा लंडन मॅरेथॉन स्पर्धेत बाजी मारली. किपसेंगने आपल्याच देशाच्या स्टेनली बिवोटला 26 मिनिटांनी मागे सोडले. बिवोट दुसरे तर इथोपियाचा सेगाए केबिदेने तिसरे स्थान मिळवले. फराह सुरुवातीलाच मागे पडला. यानंतर तो पुन्हा आघाडी घेऊ शकला नाही. त्याने दोन तास 8 मिनिटे आणि 21 सेकंदांसह आठवे स्थान मिळवले. ही कामगिरी ब्रिटिश रेकॉर्डपेक्षाही सुमार ठरली.

पहिल्यांदा बाजी मारली
एडना किप्लागत मागच्या दोन स्पर्धेत उपविजेती ठरली होती. मात्र, या वेळी तिने विजेतेपद पटकावले. किप्लागतने दोन तास 20 मिनिटे आणि 21 सेकंदांच्या वेळेसह बाजी मारली. हे तिचे लंडन मॅरेथॉनचे पहिले विजेतेपद आहे. किप्लागतने अखेरच्या 200 मीटरमध्ये जबरदस्त वेग दाखवताना आपल्याच देशाच्या लोरेंस किप्लागतला मागे टाकले. यामुळे लॉरेंसला दुसर्‍या स्थानी आली. ती अवघ्या तीन सेकंदाने दुसर्‍या क्रमांकावर आली. तिने दोन तास 20 मिनिटे आणि 24 सेकंदांचा वेळ लावला. इथिओपियाच्या तिरनेश दिबाबा विजेत्या खेळाडूपासून 14 सेकंदाने मागे राहिल्याने तिसरी आली.

दिबाबाने दमदार कामगिरी करून आपले मॅरेथॉन पदार्पण संस्मरणीय ठरवले. मागच्या वर्षीची विजेता प्रिस्काह जेप्टू 25 कि.मी. नंतर शर्यतीतून बाहेर पडली. ऑलिम्पिक चॅम्पियन टिकी गेलाना नववी आली.