आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीसीसीआयमध्ये आलो तर सर्व रोग दूर करीन - ललित मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी भाजप समर्थक, नव्या सरकारकडून फायदा होईल
चार वर्षांपासून लंडनमध्ये राहणारे आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यावरील ग्रहण सुटले आहे. दिल्ली हायकोर्टाने त्यांचा पासपोर्ट दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर क्रिकेट जगतात घडामोडींना वेग आला. मोदी भारतात केव्हा येतील आणि त्यांची भविष्यातील रणनीती काय असेल, याबाबत सविस्तर माहिती त्यांनी नरेश शर्मा (जयपूर) यांना ई-मेलवर दिलेल्या मुलाखतीत दिली.
प्र. पासपोर्ट परत मिळाल्याने सुटकेचा नि:श्वास टाकला का? मायदेशी केव्हा परतणार?
ललित : न्यायालयाच्या निर्णयाने मी खुश आहे. चुकीच्या पुराव्यावर आधारित खटला आपल्या न्यायव्यवस्थेसमोर टिकू शकत नाही, हे सिद्ध झाले. मी भारतात परतण्यासाठी आतुर आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेविषयी कसलीच जोखीम वाटणार नाही, त्या वेळी पहिल्या फ्लाइटने येईन.

प्र. फेमामुळे भारतात येण्यास उशीर होत आहे काय?
ललित : नाही. ईडीने माझ्याविरुद्ध जे प्रकरण उचलले होते ते मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायालयाने ईडीला नव्याने नोटीस देण्याचे सांिगतले. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही.

प्र. बीसीसीआयमध्ये पुनरागमनास इच्छुक आहात का?
ललित : होय. बीसीसीआयमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा आहे. असे झाल्यास क्रिकेटला स्वच्छ करीन. ज्या रोगांनी सध्या बीसीसीआयला कवटाळले आहे, त्या रोगांना खेळापासून दूर करायचे आहे. सध्या माझे लक्ष्य आरसीएला (राजस्थान क्रिकेट संघटना) ट्रॅकवर आणण्याचे आहे.
प्र. श्रीिनवास सध्या आयसीसीचे चेअरमन आहेत. बीसीसीआयवर त्यांचे िनयंत्रण आहे. त्यांना कशी मात देणार ?
ललित : माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण वशि्वास आहे. मुद््गल समितीचा अहवाल लोकांसमोर येईल, त्या वेळी सर्व सत्य जगासमोर येईल. ज्याने क्रिकेटचे नुकसान केले, त्याचा पदार्फाश होईल.
प्र. श्रीनिवासनना क्लीन चिट मिळाली तर पुढचे पाऊल काय?
ललित : मुद्गल समिती सत्य समोर आणण्यासाठी कसूर करणार नाही, याबाबत मला विश्वास आहे. याचे निकाल धक्कादायक असतील.

प्र. केंद्रात सरकार बदलल्याने भारतात तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती झाली काय ?
ललित : काही लोकांना असे वाटत आहे आणि मीसुद्धा म्हणू शकतो की केंद्रात बदल झाल्याने मला फायदा होईल. मी भाजपचा समर्थक आहे, हे सत्य आहे.

प्र. अरुण जेटलींशी तुमचे जमत नव्हते. समस्या कायम आहे की तुमच्यात सामंजस्य झाले आहे ?
ललित : मी जेटली यांचा आदर करतो. आमच्यात क्रिकेटशी संबंधित प्रकरणावर मतभेद आहेत. याशिवाय काहीच नाही.

प्र. मंडळाने आरसीएला कॅलेंडरमधून वगळले. आरसीएचे अध्यक्ष म्हणून तुम्ही हे प्रकरण कसे सोडवणार ?
ललित : असे करून बीसीसीआय क्रिकेटचे नुकसान करीत आहे. मी राज्यातील खेळाडूंना क्रिकेट खेळण्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष करीन.