आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्‍यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस मार्टिनने घेतली निवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्‍टन- न्‍यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस मार्टिनने बुधवारी निवृत्‍तीची घोषणा केली. न्‍यूझीलंडकडून कसोटीमध्‍ये सर्वाधिक बळी घेणा-या गोलंदाजामध्‍ये तो तिस-या स्‍थानी आहे. मार्टिनने 12 वर्षांच्‍या आपल्‍या आंतरराष्‍ट्रीय करिअरमध्‍ये न्‍यूझीलंडकडून 71 कसोटीत 33.81च्‍या सरासरीने 233 विकेट घेतल्‍या आहेत.

38 वर्षीय मार्टिनने आपण क्रिकेटचा मोठा आनंद घेतला असल्‍याचे म्‍हटले. तर न्‍यूझीलंड क्रिकेटचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डेव्हिड वाईट यांनी मार्टिनने कीवी टीमला पुढे आणण्‍यात महत्‍वाची भूमिका निभावल्‍याचे म्‍हटले.

गोलंदाजीबरोबरच मार्टिन आपल्‍या कमकुवत फलंदाजीसाठीही प्रसिद्ध होता. त्‍याने आपल्‍या कसोटी करिअरमध्‍ये केवळ 2.36च्‍या सरासरीने धावा बनवल्‍या. त्‍याची सर्वोच्‍च धावसंख्‍या ही 12 इतकी होती. कसोटीमध्‍ये सर्वाधिक शून्‍यावर बाद होणा-या खेळाडूंच्‍या यादीत तो दुस-या स्‍थानी आहे. पहिल्‍या क्रमांकावर वेस्‍टइंडीजचा कर्टनी वॉल्‍श आहे. वॉल्‍शला 43 वेळा तर मार्टिनला 36 वेळा खाते उघडता आलेले नाही. परंतु, वॉल्‍शने त्‍याच्‍यापेक्षा दुप्पट कसोटी खेळले होते.