आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केकेआर-पंजाबची झुंज !, पंजाब आणि कोलकाता विजयी ट्रॅकवर परतण्यास इच्छुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गतविजेता काेलकाता नाइट रायडर्स अाणि गत उपविजेता किंग्ज इलेव्हन पंजाब टीम शनिवारी अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत भिडणार अाहेत. गत सामन्यातील पराभवातून सावरलेल्या या दाेन्ही टीमचा विजय संपादन करून स्पर्धेत दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न असेल. अाठव्या सत्रात अद्याप काेलकाता अाणि पंजाबचा संघ अापली छाप पाडू शकले नाहीत. त्यामुळे चमत्कारिक कामगिरी करण्याचा या दाेन्ही टीमचा प्रयत्न असणार अाहे. पुण्याच्या मैदानावर हा सामना रंगणार अाहे.

गत चॅम्पियन काेलकाता टीमने अातापर्यंत दाेनपैकी एका सामन्यात विजय संपादन केला. तसेच पंजाबच्या संघाने तीनपैकी एकाच सामन्यात विजय संपादन केला. उर्वरित दाेन्ही सामन्यात पंजाबला धूळ चाखावी लागली. अाता पंजाबवर मात करून स्पर्धेत दमदार पुनरागमन करण्याचा काेलकाता नाइट रायडर्स संघाचा प्रयत्न असेल. यासाठी काेलकात्याच्या टीमला गाैतम गंभीरकडून माेठ्या खेळीची अाशा अाहे. त्यामुळे या सामन्यात काेलकाता टीम विजय संपादन करेल,असे चित्र अाहे. दुसरीकडे पंजाब टीमनेही विजयासाठी कंबर कसली अाहे. मागच्या पराभवाला दूर ठेवून स्पर्धेत पुन्हा कमबॅक करण्यासाठी जॉर्ज बेलीची टीम प्रयत्नशील असेल.
अाज हाेणारे सामने

मिलर, मॅक्सवेलकडून निराशा
किंग्ज इलेव्हन पंजाबकडून अद्याप डेव्हिड मिलर अाणि ग्लेन मॅक्सवेलने निराशा केली अाहे. या दाेन्ही खेळाडूंना गत सत्रासारखी झंझावाती खेळी करता अाली नाही. याचा पंजाबच्या टीमला माेठा फटका बसत अाहे. युसूफ, राॅबिन अपयशी : केकेआर अापल्या दिग्गज खेळाडूंच्या अपयशामुळे अडचणीत अाहे. या संघाचा युसूफ पठाण अाणि राॅबिन उथप्पा अद्याप समाधानकारक अशी खेळी करू शकले नाहीत. युसूफने अातापर्यंत दाेन सामन्यांत केवळ १७ धावा काढल्या अाहेत.

सनरायझर्स हैदराबादपुढे आज दिल्ली डेअरडेव्हिल्स
विशाखापट्टणम | अाठव्या सत्राच्या अायपीएलमध्ये सुमार कामगिरीमुळे अडचणीत सापडलेला सनरायझर्स हैदराबाद संघ विजयासाठी सज्ज झाला अाहे. हैदराबाद संघाला शनिवारी विशाखापट्टणमच्या मैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागले. गत सामन्यात बाजी मारून दिल्लीने स्पर्धेत पुनरागमन केले अाहे. अाता विजयाची ही लय कायम ठेवण्याचा दिल्ली टीमचा प्रयत्न असेल.

हैदराबाद अाणि दिल्ली हे दाेन्ही संघ अातापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले अाहेत. यातील दाेन्ही सामन्यांत या टीमला पराभवाला सामाेरे जावे लागले. या दाेन्ही टीमला अातापर्यंत एकच विजय संपादन करता अाला. गत सामन्यातील विजयाच्या बळावर दाेन गुणांची कमाई करून दिल्ली संघाने गुणतालिकेत चाैथे स्थान गाठले. तसेच दाेन गुणांसह हैदराबादचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर अाहे. हैदराबाद संघाला गत सामन्यात राजस्थान राॅयल्सकडून पराभव पत्करावा लागला. तसेच दिल्लीने पंजाबवर मात केली.

स्टार खेळाडू
दिल्ली डेअरडेव्हिल्स : जेपी डुमिनी, युवराजसिंग, अमित मिश्रा, इम्रान ताहिर, मयंक अग्रवाल.
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वाॅर्नर, शिखर धवन, रवी बाेपारा, ट्रेंट बाेल्ट, के. विल्यम्सन