आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KKR Player Robin Uthappa Allegedly Misbehave With Sarfaraz Khan

IPL: सरफराजला मारण्यासाठी धावला होता उथप्पा, डिव्हिलिअर्स-डिंडाने वाचविले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकता नाईटरायडर्सचा खेळाडू रॉबिन उथप्पा वादात सापडला आहे. शनिवारी कोलकत्यात झालेल्या केकेआर आणि आरसीबी सामन्यात खेळ सुरु असताना रॉबिन उथप्पा बेंगळुरुचा रिझर्व्ह खेळाडू सरफराज खान याला मारण्यासाठी धावला होता. क्रिस गेल आऊट झाल्यानंतर सरफराज मैदानावर ड्रिंक्स घेऊन गेला होता. यावेळी उथप्पाचे त्याच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले. आरसीबीने हा सामना तीन विकेट्सनी जिंकला.
बंगळुरुचा क्रिस गेल तुफानी फलंदाजी करीत होता. पण तो 19 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानंतर टीमचा रिझर्व्ह खेळाडू सरफराज ड्रिंक्स घेऊन मैदानात आला. तेव्हा उथप्पा आणि सरफराज यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. पुढील चार ओव्हरमध्ये सामना खतम झाला. तेव्हा वाटले, की आता भांडण मिटले आहे. पण तसे नाही झाले. प्रेझेंटेशन सेरेमनी सुरु असताना उथप्पा सरफराजला शिव्या मारत होता. यावेळी तो त्याला मारायलाही धावला. हे भांडण काही मिटता मिटेना. तेव्हा बंगळुरुचे खेळाडू डिव्हिलिअर्स आणि डिंडा यांनी मध्यस्ती करीत वाद मिटवला.
तक्रार नोंदवली नाही
या प्रकरणी रॉबिन उथप्पा याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. सरफराज यानेही तक्रार दिलेली नाही. या मॅचचे रेफरी जवागल श्रीनाथ म्हणाले, की मला अद्याप कोणतीही तक्रार मिळालेली नाही. हे प्रकरण आता शांत झाले असेल.
कोणतीही मॅच संपल्यानंतर सुमारे तासभर मॅच रेफरी मैदानात असतात. त्यावेळी काही तक्रार मिळाली तर त्यावर लगेच कारवाई केली जाते.
पुढील स्लाईडवर वाचा, आयपीएलच्या खेळाडूंमध्ये आतापर्यंत झालेले गंभीर वादविवाद... भज्जीने श्रीसंतच्या कानाखाली लावली होती.... कोहलीचेही झाले होते भांडण....