आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्सवेल-उथप्पा आज झुंजणार, पंजाबचा संदीपवर विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पंजाबचा ग्लेन मॅक्सवेल आणि कोलकात्याचा रॉबिन उथप्पा हे स्फोटक फलंदाज आपल्या टीमचे आयपीएल-7 च्या फायनलचे तिकीट निश्चित करण्यासाठी मंगळवारी झुंजणार आहेत. यंदाच्या सत्रातील दोन अव्वल टीम किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात क्वालिफायर-1 चा सामना रंगणार आहे.
या सामन्यातील विजेत्या टीमला अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित करता येईल, तर पराभूत झालेल्या संघाला पुन्हा एकदा संधी मिळेल. हा संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील विजेत्या टीमशी 30 मे रोजी सामना खेळेल. या सामन्यातील विजयी संघाला फायनल खेळता येणार आहे.
आतापर्यंतची पंजाबच्या किंग्ज इलेव्हनची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. या संघाने स्पर्धेत 14 पैकी 11 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे कोलकात्याला केवळ नऊच सामन्यांत विजय मिळवता आला. या दोन्ही संघांचे पारडे अधिकच मजबूत आहे. केकेआरला दुसर्‍यांदा फायनल गाठण्याची संधी आहे. या टीमने एकदा ही स्पर्धा जिकंली आहे. मात्र, पंजाबसाठी ही पहिलीच संधी ठरणार आहे. त्यामुळे या संधीचे चीज करण्याचा पंजाबचा प्रयत्न असणार आहे.
मॅक्स-मिलरवर मदार
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विजयाची मदार डेव्हिड मिलर आणि मॅक्सवेल यांच्यावर असेल. कोलकात्याविरुद्ध गत सामन्यात मात्र हे दोन्ही फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. आता धडाकेबाज कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या दोघांचा उत्साह वाढवण्यासाठी जॉर्ज बेली, मनन वोहरा, सेहवागदेखील आहेत.
पंजाबचा संदीपवर विश्वास
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजीची जबाबदारी युवा खेळाडू संदीप शर्मावर असेल. सध्या पंजाबकडून गोलंदाजीत संदीप हा यशस्वी खेळाडू ठरला आहे. त्याच्यामध्ये आता उथप्पा, युसूफ आणि गौतम गंभीरला रोखण्याची क्षमतादेखील आहे. सोबतच मिशेल जॉन्सनदेखील आहे. त्यामुळे पंजाबला केकेआरच्या दिग्गजांना कमी धावांत रोखता येईल.
केकेआरमध्ये अनेक मॅचविनर
पंजाबच्या तुलनेत कोलकाता नाइट रायडर्स टीममध्ये अनेक मॅचविनर आहेत. या संघाकडे रॉबिन उथप्पा, शाकीब, गौतम गंभीर आणि मनीष पांडेसारखे विश्वासू खेळाडू आहेत. मॅक्सवेलसारखेच तुफान युसूफच्या रूपाने टीममध्येदेखील आहे.