आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About IPL Glamarous Host Archana Vijaya Personal Life

PHOTOS : ही आहे IPL ची ग्लॅमरस होस्ट, मॉडेलिंगमध्येही आहे HIT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अत्यंत रंजक अशा आयपीएल स्पर्धेच्या यशामध्ये क्रिकेटबरोबरच सोहळ्याचे उत्कृष्ट सादरीकरण याचाही तेवढाच मोठा वाटा आहे. या सादरीकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती अँकर्सची. आयपीएलमध्ये गेल्या आठ वर्षात अनेक फिमेल अँकरही आढळून आल्या आहेत. यात आजवर सर्वाधिक लोकप्रिय ठरली ती अर्चना विजया. अर्चना एक प्रसिद्ध टिव्ही शो होस्ट आणि टिव्ही प्रेझेंटर आहे. ती भारतातील एक प्रसिद्ध मॉडेलही आहे.
2011 मध्ये सर्वप्रथम आयपीएल -4 द्वारे अर्चनाने आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. तिच्या या प्रयत्नाला तिच्या आणि क्रिकेट चाहत्याची पसंती मिळाली. त्यामुळेच गेली काही वर्षे ती आयपीएलमध्ये अँकरींग करत आहे. अर्चनाच्या मते तिला स्वतःला देखिल क्रिकेटची आवड आहे. त्यामुळे ती या खेळाचे अँकरींगही तेवढेच एन्जॉय करते. सध्या आयपीएलमध्ये ती एक्स्ट्रा इनिंग कार्यक्रम होस्ट करते.

अर्चनाचा प्रवास...
> जन्म 17 नोव्हेंबर, 1982 मध्ये कोलकात्यात झाला होता.
> कोलकात्यातच शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईला गेली.
> 2004 मध्ये 'गेट गॉर्जियस' हा शो करियरचा टर्निंग पॉइंट ठरला. त्याच शोने तिला लोकप्रियताही मिळाली. हा शो जिंकल्यानंतर त्याच शोचे पुढचे पर्व होस्ट करण्याची संधी तिला मिळाली.
> त्यानंतर ती चॅनल व्हीसह अनेक शोमध्ये व्हिडिओ जॉकी म्हणूनही दिसून आली.
> 2011 म्हणजे आयपीएल-4 मध्ये प्रथमच होस्ट.
> रियालिटी शो 'झलक दिखला जा 5' मध्येही सहभागी झाली होती.
> निओ स्पोर्ट्स चॅनलमध्येही तिने काम केले आहे. त्यादरम्यान अनेक क्रिकेटपटुंबरोबर फिरण्याची संधी तिला मिळाली आहे.
> ती NIFT ची मॉडेलही होती.
> 2012 मध्ये अर्चनाने FHM मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट केले होते. तिने टोयोटा, पार्कर पेन, लॉरियल, नाइकी, सॅमसंग मोबाइलसह अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे.
> 2005 मध्ये एका प्रमुख मीडिया हाऊसने तिला 'फेस ऑफ द ईअर' घोषित केले होते. आज अर्चना आयपीएलची सर्वात ग्लॅमरस आणि टिव्ही जगतातील चर्चिच होस्ट आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अर्चनाचे काही PHOTO's