आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वकांक्षी व जिद्दी आहेत श्रीनिवासन, गे मुलालाही लोटले दूर...!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- मोठया प्रयत्‍नानंतरही आपल्‍या पदाचा त्‍याग न केल्‍यामुळे बीसीसीआय अध्‍यक्ष नारायणस्‍वामी श्रीनिवासन यांच्‍यावर टीका होत आहे. स्‍पॉट फिक्सिंगप्रकरणात आपल्‍या जावयाचे नाव आल्‍यानंतरही ते अजूनही खूर्चीला चिटकून आहेत. अनेकांनी तर त्‍यांच्‍या या भुमिकेसमोर हात टेकले. असे काय आहे की एन. श्रीनिवासन हे पद सोडण्‍यास अजूनही तयार नाहीत ? हेच जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न divyamarathi.comने केला आहे.

68 वर्षीय श्रीनिवासन हे ऊंची वस्‍तूचे मोठे शौकिन आहे. त्‍यांना गोल्‍फ खेळणे आणि स्‍कॉच पिणे पसंत आहे. रोलेक्‍सचे घडयाळ त्‍यांना खूप आवडते. श्रीनिवासन यांना क्रिकेट आणि सिमेंट खूप प्रिय आहे, असे त्‍यांच्‍या एका निकटवर्तीयाने सांगितले.

उल्‍लेखनीय म्‍हणजे, कोणत्‍याही दबावाचा त्‍यांच्‍यावर काहीच परिणाम होत नाही. गेल्‍या काही महिन्‍यांपासून इंडिया सिमेंट्सला मोठया प्रमाणात तोटा होत आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर भागधारकांचाही दबाव आहे. मात्र, याचा त्‍यांच्‍यावर काहीच परिणाम झालेला नाही.

दोन भाऊ आणि दोन बहिणींमध्‍ये श्रीनिवासन सर्वात मोठे. 1968 मध्‍ये त्‍यांच्‍या वडीलांचे अचानक निधन झाले. त्‍यावेळी ते शिकागो य‍ेथे इलिनॉईस इन्स्ट्टियूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे केमिकल इंजिनिअरींगमध्‍ये मास्‍टर ऑफ सायन्‍सचे शिक्षण घेत होते. त्‍यांनी शंकरलिंगम यांचा मुलगा के.एस. नारायण यांच्‍याबरोबर काम सुरू केले. 80च्‍या दशकाच्‍या सुरूवातीलाच नारायणबरोबरील त्‍यांच्‍या संबंधात कटूता निर्माण झाली. प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाच्‍या निकालाप्रमाणे श्रीनिवासन यांना कंपनीमधील आपले पद आणि नियमित कामकाजात सहभागी होण्‍यावर बंदी घालण्‍यात आली.

त्‍यानंतर त्‍यांनी आपले खास मित्र आणि एम करूणानिधींचे भाचे मुरोसोली मारन यांच्‍या मदतीने आयडीबीआय बँकेच्‍या साहाय्याने या फर्मवर नियंत्रण मिळवले. जेव्‍हा 1989 मध्‍ये द्रविड मुनेत्र कळघम पक्ष सत्तेवर आला, तेव्‍हा श्रीनींच्‍या (श्रीनिवासन यांना त्‍यांचे घरचे आणि जवळचे मित्र श्रीनि म्‍हणतात.) व्‍यवसायाने झेप घेण्‍यास सुरूवात केली. तो काळ सिमेंट व्‍यवसायासाठी अत्‍यंत अनुकूल असा होता. कारण 1970 मध्‍ये सिमेंटवर लावण्‍यात आलेले सरकारी नियंत्रण हटवण्‍यात आले होते. डीएमके सरकार सत्तेवर येताच एका वर्षाच्‍या आतच श्रीनिंची इंडिया सिमेंट्स दक्षिण भारतातील सर्वात मोठी उत्‍पादक कंपनी बनली. त्‍याचदरम्‍यान त्‍यांनी शिपींग व्‍यवसायातही पदार्पण केले. या व्‍यवसायात त्‍यांचा जुना व्‍यावसायिक शत्रू सन्‍मर ग्रूप पहिल्‍यापासूनच कार्यरत होता. त्‍यांनी अरूणा शुगर्स फायनान्‍स नावाने आर्थिक क्षेत्रातही उडी घेतली. 1997 साली त्‍यांनी याचे नाव बदलून इंडिया सिमेंट्स कॅपिटल अँड फायनान्‍स लिमिटेड असे ठेवले.

अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...