आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Star Indian Cricketers And Their Businesses News In Marathi

कोहलीपासून धोनीपर्यंत, वाचा- कोणता बिझनेस करतात इंडियन क्रिकेटर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाच स्टार क्रिकेटर विराट कोहलीने 'फिटनेस' बिझनेसमध्ये पाऊल ठेवल्याचे त्याचा बिझनेस पार्टनर सत्या सिन्हा याने सांगितले. विराट कोहलीने सत्या सिन्हा आणि एका कंपनीसोबत ‘चिसेल’ नामक जिम सुरू करणार आहे. 'चिसेल'चे देशभरात सेंटर्स उघडले जाणार आहेत. विराटसह अनेक क्रिकटर्सनी छंदातून अनेक बिझनेस साकारले आहेत.
विराट कोहलीने क्रिकेट खेळण्यासोबत अनेक उद्योगात गुंतवणूक केली आहे. क्रिकेटर्स क्रिकेट व्यतिरिक्त अनेक उचापती करत असतात. त्यातून ते बक्कळ पैसाही कमावतात.

क्रिकेटरपासून बिझनेसमन बनलेल्यांमध्ये कर्णधार एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सहेवागसह अनेकांचा समावेश आहे. यापैकी अनेकांचा रेस्तरॉ आणि फिटनेसचा बिझनेस आहे.
धोनी या बिझनेसमधून करतो बक्कळ कमाई...
टीम इंडियाचा कर्णधार एमएस धोनी हे देशातील सर्वात लोकप्रिय व्यक्तीमत्त्व आहे. अनेक ब्रान्ड्सला एन्डोर्स करण्‍याशिवाय अनेक उद्योगात गुंतवणूक केली आहे. धोनीची अनेक कंपन्यांमध्ये भा‍गिदारी आहे. धोनी सद्यस्थितीत एक फिटनेस कंपनी चालवतो. तसेच बाइकचा चाहता असलेल्या धोनीने स्वत:ची एक रेसिंग टीम बनवली आहे. यापूर्वी धोनी फुटबॉल इंडियन सुपर लीग चेन्नईयन टीमचा को-ऑनर होता.

>स्पोर्ट्‍स फिट वर्ल्ड प्रा.लि.फिटनेस कंपनी
>इंडियन सुपर लीग फुटबॉल: चेन्नईयन एफसीचा को-ऑनर
>एका स्फोर्ट्‍स मार्केटिंग फर्ममध्ये 15 टक्के भागिदारी
>माही रेसिंग टीमचा ऑनर

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांच्या बिझनेसविषयी...