आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, \'विक्रमवीर\' सचिनची जागा घेऊ पाहणा-या विराट कोहलीविषयी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटपटू विराट कोहली आज (5 नोव्हेंबर) 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. पंजाबी कुटुंबात जन्मलेला विराट आज क्रिकेटच्या अशा शिखरावर पोहोचला आहे, जेथे जाण्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटू जीव तोडून प्रयत्न करत असतो. विराट कोहलीने सहा वर्षांपूर्वी 18 ऑगस्‍ट रोजी करिअरला सुरुवात केली होती. लवकरच यशाची शिखरे पादाक्रांत केली. भारताचा दिग्‍गज आणि आश्‍वासक चेहरा अशी त्‍याची ओळख निर्माण झाली.
सचिनशी होते तुलना
भारताचा विक्रमवीर आणि क्रिकेटजगतातील महानायक सचिन तेंडूलकरशी विराटची तुलना केली जाते. वेगवान शतके लगावण्‍यात सचिनच्‍या वेगापक्षाही विराटचा वेग जास्‍त आहे. सचिन तेंडुलकरने जेव्‍हा क्रिकेटमधून निवृत्‍ती घेतली तेव्‍हा त्‍याला, तुझी उणीव कोण भरुन काढेल? असा प्रश्‍न विचारला असता सचिनने विराट कोहली आणि रोहित शर्माचा नामोल्‍लेख केला होता.
मोडला सचिनचा विक्रम
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्‍या चांगलाच लयीत आला असून त्‍याने एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये सर्वांत गतीने 20 शतके पूर्ण करण्‍याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला आहे. विराट कोहलीने वेस्ट इंडीज विरुध्‍द 127 धावांची खेळी करुन 20 वे शतक झळकावले. विराटने केवळ 133 डावांमध्‍ये 20 शतके पूर्ण केले. तर सचिन तेंडुलकरने 197 डावांमध्‍ये 20 शतके पूर्ण केले होते. विराटने सचिनपेक्षा 64 डावांपूर्वीच 20 वे शतक पुर्ण केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, क्रिकेटमधील विराटचे विक्रम...