आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-8चा आजपासूच थरार; वाचा, आयपीएलमध्ये सहभागी संघांची बलस्थाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून किरन पोलार्ड, विराट कोहली आणि युवराज सिंह)
कोलकाता- आयपीएल-8च्या महासंग्रामास आजपासून प्रारंभ होत आहे. 47 दिवस चालणार्‍या या टी-20 स्पर्धेचा पहिला सामना आज (बुधवारी) कोलकाता नाइट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. आयपीएल-8 मध्ये भारतीय युवा क्रिकेटर युवराज सिंगची जास्त चर्चा आहे. या हंगामातील तो सगळ्यात महागडा क्रिकेटपटू आहे. आयपीएलमध्ये दुसर्‍यांदा युवराजवर सर्वाधिक बोली लागली आहे. दिल्ली डेयरडेव्हिल्सने 16 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. यापूर्वी 2014 मध्ये मद्यसम्राट विजय माल्यांचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने युवराजला 14 कोटी रुपयांत खरेदी केले होते.
आयपीएलच्या संघांतील क्रिकेटपटू प्रत्येक वर्षी बदलतात...
गत आयपीएलमध्ये बंगळुरू संघाकडून खेळलेला युवी यंदा दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. आयपीएल अशी क्रिकेट स्पर्धा आहे की, भारतीय आणि विदेशी क्रिकेटपटू एकसोबत खेळतात. मात्र, प्रत्येकवर्षी आयपीएलच्या संघातील क्रिकेटपटू बदलतात. आयपीएलच्या महासंक्रामात एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघात एकूण 25 क्रिकेटपटू आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, आयपीएल-8 मध्ये सहभागी झालेल्या संघांची बलस्थाने....