आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयसीसी टी-20 क्रमवारीत कोहली, रैना टॉपटेनमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - भारताचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि सुरेश रैनाने आयसीसी टी-20 क्रमवारीच्या टॉपटेनमध्ये धडक मारली. टीम इंडिया आपल्या तिस-या स्थानावर कायम आहे.


फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली 731 गुणांसह आठव्या स्थानी आहे. तसेच रैनाने 719 गुणांसह नववे स्थान गाठले. दुसरीकडे अव्वल 20 क्रमवारीत युवराजने 14 वे आणि गौतम गंभीरने 18 वे स्थान पटकावले. न्यूझीलंडचा मॅक्ल्युम 810 गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे, तर श्रीलंकेचा महेला जयवर्धने दुस-या व न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तिल तिस-या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन क्रमवारीत पाचव्या स्थानावर आला.