आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली, धवन टॉप फाइव्हमध्ये, कर्णधार महेंद्रसिंग धोनी वनडेत सातव्या स्थानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या दोन फलंदाजांनी टॉप-५ मध्ये स्थान मिळवले. भारताकडून विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवन हे दोघे अव्वल पाचमध्ये सामील आहेत. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत दमदार प्रदर्शनाचा फायदा धवनला झाला. त्याने चार स्थानांच्या प्रगतीसह पाचवे स्थान मिळवले आहे.
श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत सहभागी नसलेला भारतीय िक्रकेट संघाचा नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे एका स्थानाने नुकसान झाले असून तो आता सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. धोनी दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेतून एकही सामना खेळू शकला नाही.
टॉप टेन वनडे फलंदाज
क्र. फलंदाज देश गुण
एल्बी डिव्हिलर्स द. आफ्रिका ८८३
हाशिम आमला द. आफ्रिका ८५५
विराट कोहली भारत ८४३
जॉर्ज बेली ऑस्ट्रेलिया ८०२
शिखर धवन भारत ७८५
कुमार संगकारा श्रीलंका ७८४
महेंद्रसिंग धोनी भारत ७४६
डी. कॉक द. आफ्रिका ७३९
टी. दिलशान श्रीलंका ७३२
१० रॉस टेलर न्यूझीलंड ७०२