आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kohli Dililiars Strong Fight For The One Day Ranking

कोहली-डिव्हिलियर्समध्ये चुरस,एकदिवसीय क्रमवारीच्या अव्वल स्थानासाठी दोघांत चढाओढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स यांच्यात एकदिवसीय सामन्यांतील टॉप-10 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानासाठी जोरदार संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. भारतीय संघ सध्या द. आफ्रिकेच्या दौ-यावर असून येत्या 5 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्यांच्यातील चुरस बघायला मिळेल. विराट सध्या प्रथमस्थानी तर डिव्हिलियर्स द्वितीय स्थानावर आहे. दोघांच्या स्थानामध्ये केवळ 17 गुणांचा फरक आहे आणि दोघेही यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
नुकतीच संपलेल्या वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेत विराट कोहलीला मालिकाविराचा बहुमान मिळाला होता. डिव्हिलियर्सने पाकविरुद्ध तिस-या सामन्यात विजयी खेळी केली होती. या खेळीने तो फॉर्मात आला.
तुलनात्मक आकडेवारी
विराटने एकदिवसीय सामन्यात चार शतके आणि सात अर्धशतके झळकावली आहेत तर डिव्हिलियर्सने दोन शतके व सहा अर्धशतके ठोकली आहेत. कोहलीची यंदा नाबाद 115 धावा, तर डिव्हिलियर्सची 128 धावांची सर्वोच्च् खेळी होती. विराटने 98.17 च्या आणि डिव्हिलियर्सने 93.11 च्या स्ट्राईक रेटने यंदा धावा काढल्या आहे. यादरम्यान कोहलीने 56.22, तर डिव्हिलियर्सने 48.70 सरासरी राखली होती. आकडेवारीनुसार विराट कोहलीचे पारडे सध्या तरी जड वाटत आहे.