आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहलीने धाेनीकडून शिकावे, अाॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वाॅचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाय - विराट काेहलीने त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवून परिपक्व कर्णधार कसे बनायचे, त्याबाबत विद्यमान भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धाेनी याच्याकडून शिकण्याची गरज असल्याचे मत विश्वचषक जिंकणाऱ्या अाॅस्ट्रेलियन संघाचा कप्तान स्टीव्ह वाॅ याने व्यक्त केले अाहे.

धाेनीने कसाेटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती पत्करली असल्याने ती धुरा काेहलीला सांभाळायची अाहे. धाेनीने अाॅस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या कसाेटीपूर्वीच निवृत्ती पत्करली हाेती. त्या पार्श्वभूमीवर बाेलताना वाॅ याने काेहलीला अद्याप कप्तानीचे खूप गुण शिकण्याची गरज असल्याचे सांगितले.

फार भावनिकता नकाे
काेहलीला चांगला कर्णधार व्हायचे असेल तर परिपक्वता अंगात बाणवावी लागेल. त्यासाठी तुम्ही फार भावनिक असून चालत नाही. काही बाबींमध्ये काेहली खूप वैयक्तिक लावून घेताे. कर्णधाराची कातडी थाेडी जाडच ठेवावी लागते. तशी धाेनीने प्रयत्नपूर्वक राखली अाहे, असे वाॅने नमूद केले.