आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफतुल्लाह, बांगलादेश - भारतीय संघाचा आधारस्तंभ बनलेला विराट कोहली हा फलंदाजीतील सर्व आंतरराष्टÑीय विक्रम मोडीत काढेल, असा विश्वास पाकचे माजी कर्णधार जहीर अब्बास यांनी म्हटले आहे.
भारतीय फलंदाजीतील संक्रमणाचा काळ संपुष्टात आला असून विराटमुळे संघाची मधली फळी भक्कम बनली असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानकडेही काही सक्षम फलंदाज आहेत, मात्र अद्याप त्यांचा क्रम व्यवस्थितपणे लागू शकलेला नसल्याचे अब्बास यांनी म्हटले आहे. पाकचा अहमद शहजाद हा सलामीचा एक गुणी फलंदाज असून तो हळूहळू परिपक्व बनेल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
चुकीसाठी तेव्हा शिक्षा मिळायची, आता दाद मिळते
पूर्वी खेळाडूंमध्ये फार आत्मविश्वास नसायचा. मात्र, सध्याचे खेळाडू हे कितीही तणावाची स्थिती असली तरी आत्मविश्वासाने मला सांगतात की, ‘जहीरभाई, काळजी करू नका, आपणच जिंकू.’ मी आणि सुनील गावसकर एकदा सामना पाहत असताना एका फलंदाजाच्या बॅटची कड लागून उडालेल्या झेलचा स्लिपजवळून चौकार गेला. त्या वेळी ‘सनी’ मला म्हणाला होता, ‘असे झाले तर आमचे प्रशिक्षक आम्हाला मैदानाच्या पाच फेर्या मारायला लावायचे. मात्र, सध्या अशा जीवदान मिळालेल्या फटक्यांनाही प्रेक्षकांकडून भरपूर दाद मिळते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.