आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolkata Curator Stops Rohit Sharma In Eden Gardens

पिच पाहण्‍यापासून रोखल्‍यामुळे रोहित शर्माने घातला क्‍युरेटरबरोबर वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- सचिन तेंडुलकरच्‍या 199व्‍या कसोटीपूर्वी ईडन गार्डन्‍सच्‍या पिचवरून वाद झाला आहे. ईडन गार्डन्‍सचे क्‍युरेटर प्रबीर मुखर्जी यांनी रोहित शर्माला पिचचे निरीक्षण करण्‍यापासून रोखले. सोमवारी रोहितला पिचची पाहणी करण्‍यासाठी जायचे होते. परंतु, मुखर्जी यांनी पिचजवळ त्‍याला जाऊ दिले नाही. हे तेच प्रबीर मुखर्जी आहेत, ज्‍यांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीबरोबर पिचवरून वाद झाला होता.

ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या वनडे मालिकेचा शिल्‍पकार ठरलेला रोहित शर्मा 6 नोव्‍हेंबरपासून सुरू होणा-या वेस्‍ट इंडीजविरूद्धच्‍या कसोटीत पदार्पण करू शकतो. रोहित जेव्‍हा स्‍टेडिअमवर पोहोचला तेव्‍हा तो पिचची पाहणी करून आपल्‍या फलंदाजीची रणनीती ठरवण्‍याची योजना करणार होता. परंतु, मुखर्जी यांनी त्‍याच्‍या योजनेवर पाणी फेरले. मुखर्जी यांनी नियमांचे पालन केले आणि रोहितला त्‍यांनी रोखले.

यावरून रोहित आणि मुखर्जी यांच्‍यात वाद झाल्‍याचे वृत्त येत आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगलाचे जॉईंट सेक्रेटरी सुबीर गांगुली यांनी तेथे येऊन वातावरण शांत केले.

मुखर्जी म्‍हणाले,'मी नियमांविरोधात जाऊ शकत नाही. सामन्‍यापूर्वी फक्‍त कर्णधार किंवा प्रशिक्षक हेच पिचची पाहणी करू शकतात असे, आयसीसीच्‍या नियमांत स्‍पष्‍ट सांगितले आहे.'