आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : रायडर्सने जिंकली दिल्ली, दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ६ गडी राखून मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गाैतम गंभीरच्या काेलकाता नाइट रायडर्स संघाने अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नाेंद केली. काेलकाता संघाने साेमवारी स्पर्धेतील अापल्या चाैथ्या सामन्यात यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला. पाहुण्या संघाने ६ गडी राखून सामना अापल्या नावे केला. या शानदार विजयासह काेलकाता संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान कायम ठेवले. दिल्ली टीमचा हा तिसरा पराभव ठरला.

कर्णधार गाैतम गंभीर (६०) अाणि युसूफ पठाण (नाबाद ४०) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर काेलकाता संघाने १८.१ षटकांत सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना यजमान दिल्ली संघाने ८ बाद १४६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने ४ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले.

धावांचा पाठलाग करणाऱ्या काेलकाता संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर अाणि कर्णधार गाैतम गंभीर व राॅबिन उथप्पाने संघाला ३१ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, उथप्पा १३ धावा काढून तंबूत परतला. त्यापाठाेपाठ पांडे भाेपळा न फाेडताच अाल्यापावली माघारी परतला. सूर्यकुमार यादवने २४ धावांचे याेगदान दिले. गाेलंदाजीत दिल्लीच्या मुथुस्वामीने दाेन बळी घेतले. तसेच नाइल अाणि इम्रानने एक गडी बाद केला.

नाणेेफेक जिंकून काेलकाता संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार गाैतम गंभीरचा हा निर्णय माेर्केल अाणि सुनील नरेनने याेग्य ठरवला. या दाेघांनी फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या दिल्ली संघाच्या सलामीवीर मयंक अग्रवाल (१) अाणि कर्णधार जेपी डुमिनीला (५) स्वस्तात बाद केले. यासह दिल्लीची निराशाजनक सुरुवात झाली. त्यानंतर सलामीवीर श्रेयस अय्यर (३१), मनाेज तिवारी (३३),मॅथ्यूज (२८) अाणि युवराजसिंगला (२१) समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्यामुळे दिल्लीला माेठी धावसंख्या उभी करता अाली नाही. गाेलंदाजीत माेर्केल, उमेश यादव व पीयूष चावलाने प्रत्येकी दाेन गडी बाद केले.

गाैतम गंभीरचे शानदार अर्धशतक
काेलकाता संघाचा कर्णधार गाैतम गंभीरने शानदार अर्धशतकाची नाेंद केली. यासह त्याने संघाला विजय मिळवून दिला. त्याने ४९ चेंडूंचा सामना करताना ६० धावा काढल्या. यात अाठ चाैकारांचा समावेश अाहे. याशिवाय त्याने पठाणसाेबत चाैथ्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली. पठाणने नाबाद ४० धावांची खेळी केली.
पुढील स्लाइड्सवर, स्कोअर कार्ड आणि पॉइंट्स टेबल.