आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: केकेआर नंबर वन, कोलकाता नाइट रायडर्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर अवघ्या एका विकेटने मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता - गाैतम गंभीरच्या काेलकाता नाइट रायडर्सने अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार राेमहर्षक विजयाची नाेंद केली. काेलकाता संघाने शनिवारी अापल्या घरच्या मैदानावर जॉर्ज बेलीच्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर १ गड्याने मात केली. पंजाबचा हा सत्रातील नववा पराभव ठरला.

प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने ५ बाद १८३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने ९ गड्याच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. काेलकाताकडून उथप्पा (१७) व गाैतम गंभीरने (२४) संघाला ३१ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. मयंक पांडेने (२२) गंभीरसाेबत तुफानी खेळी केली. युसूफ पठाणने (२९) रसेलसाेबत अर्धशतकी भागीदारी केली.
तत्पूर्वी पंजाबकडून मुरली विजय (२८), वाेहरा (३९), वृद्धिमान साहा (३३) व मॅक्सवेल (४३) यांनी चांगली खेळी केली. त्यामुळे पंजाबला १८३ धावा काढता अाल्या.

रसेलचे १९ चेंंडूंत अर्धशतक
काेलकाता नाइट रायडर्सच्या अांद्रे रसेलने अष्टपैलू खेळी करून विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने गाेलंदाजीमध्ये एक विकेट घेतली.
तसेच फलंदाजीमध्ये नाबाद अर्धशतक ठाेकून संघाचा विजय निश्चित केला. रसेलने १९ चेंडूंत शानदार अर्धशतक ठाेकले. यात पाच चाैकार अाणि चार षटकारांचा समावेश अाहे. त्याने २१ चेंडूंमध्ये ५१ धावांची तुफानी खेळी केली. यासह ताे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नरेनची धारदार गाेलंदाजी
अाॅफ स्पिनप्रकरणी निलंबनाच्या कारवाईनंतर परतलेल्या सुनील नरेनने दमदार पुनरागमन केले. त्याने शनिवारी धारदार गाेलंदाजी करताना चार बळी घेतले. यासह त्याने पंजाब संघाचे कंबरडे माेडले. नरेनने चार षटकांमध्ये १९ धावा देत चार विकेट घेतल्या. तसेच अांद्रे रसेलने एक बळी घेतला. ताे फलंदाजीतही चमकला.
०१ गड्याने पंजाबवर केली मात
५१ धावांची रसेलची खेळी
५३ धावांची रसेल-युसूफची भागीदारी
०४ विकेट नरेनच्या

काेलकाता अव्वलस्थानी
या विजयासह काेलकात्याने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. या संघाने सातव्या विजयासह १५ गुणांसह हे सिंहासन काबीज केले. दुसरीकडे चेन्नईची दुस-या व वाॅटसनच्या राजस्थानची तिस-या स्थानी घसरण झाली.
बातम्या आणखी आहेत...