आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolkata Knight Riders Enteres In Champions League T 20 Final, Divya Marathi

चॅम्पियन्स लीग टी-२० च्या फायनलमध्ये कोलकाता रायडर्सची धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - यंदाच्या आयपीएल विजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाने गुरुवारी चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. गौतम गंभीरच्या या संघाने उपांत्य लढतीत होबार्ट हरिकेन्सचा ७ गड्यांनी पराभव केला.

जॅक कॅलिस (नाबाद ५४) आणि मनीष पांडे (४० ) यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या बळावर कोलकात्याने १९.१ षटकांत सामना जिंकला. युसूफ पठाणने संघाच्या विजयात नाबाद १२ धावांचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करताना होबार्ट हरिकेन्स संघाने निर्धारित षटकांत सहा गडी गमावून १४० धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने तीन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. नाबाद अर्धशतकी खेळी करणारा जॅक कॅलिस सामनावीरचा मानकरी ठरला.

जॅक कॅलिसचा झंझावात
तिस-या स्थानी आलेल्या जॅक कॅलिसने संघाचा डाव सावरला. त्याने ४० चेंडूंचा सामना करताना चार चौकार व दोन षटकारांसह संघाकडून ५४ धावा काढल्या. त्याने मनीष पांडेसोबत तिस-या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कॅलिसने पठाणसोबत अभेद्य ३४ धावांची भागीदारी करून विजय निश्चित केला.