आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल गॅलरी : रॉबिन उथप्पा तिसर्‍या स्थानावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - यंदाच्या सातव्या सत्रात रॉबिन उथप्पाने पुनरागमन करताना आयपीएलमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेललाही पिछाडीवर टाकले आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या रॉबिन उथप्पाने यंदाच्या सत्रात सर्वाधिक 613 धावांचा पल्ला गाठला आहे. यासह त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणार्‍यांमध्ये तिसर्‍या स्थानावर धडक मारली. उथप्पाने 14 सामन्यांत 47.15 च्या सरासरीने या धावा काढल्या आहेत. यात विराट कोहली मागील सत्रातील 634 धावांसह अव्वल स्थानावर आहे. तसेच सचिन तेंडुलकर 2009-10 च्या सत्रातील 618 धावांसह दुसर्‍या स्थानावर आहे.