आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolkata Knight Riders Vs Royal Challengers Banglore, Gambhir And Kohali Dispute Issue

बंगळुरूमधील सामन्यादरम्यान गंभीर आणि कोहलीत जुंपली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- बंगळुरू येथील एम.चेन्नास्वामी स्टेडिअमवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहली आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. सामना सुरु झाल्यानंतर 10 षटकादरम्यान दोघे एकमेंकाना भिडले. त्यावेळी लक्ष्मीपथी बालाजी गोलंदाजी करत होता. कोहलीने प्रदीप सांगवानच्या षटकात दोन षटकार भिरकाले होते. परंतु बालाजीच्या चेंडूवर मार्गनने कोहलीला टिपले. कोहली तंबूत परतत असताना केकेआरचा खेळाडू विकेट सेलिब्रेट करत असताना अचानक कोहली मैदानात थांबला. त्याच्या चेहर्‍यावर तेव्हा राग दिसत होता. त्यानंतर गंभीर देखील काही तरी बडबडत त्याच्याकडे वाटचाल करू लागला. दोघेही आक्रमक झाले होते. तितक्यात केकेआरचा खेळाडू रजत भाटियाने मध्यस्थी करून दोघांना शांत केले.

दरम्यान, गंभीर आणि कोहली रणजी क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळतात. तसेच त्यांच्यात झालेल्या वादात मध्यस्थी करणारे रजत भाटिया हे देखील दिल्लीतील आहे. सध्या विराट कोहली टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. तर गंभीर देखील यापूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार होता. धोनीनंतर गंभीरला कर्णधार पद मिळण्याची शक्यता आहे. परंतु कदाचित गंभीरला कोहली हा अडसर ठरू शकतो.