आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolkata Knight Riders Vs Royal Challengers Banglore Ipl Match Live

IPL: गेलच्‍या रॉयल \'षटकारां\'समोर नाईट रायडर्सचा सुपडासाफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने ठोकलेल्‍या तब्‍बल 9 षटकार आणि 4 चौकारांच्‍या सहाय्याने केलेल्‍या 85 धावांच्‍या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी आणि 15 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. आपल्‍या या खेळीसाठी गेलने अवघी 50 चेंडू घेतली. कोलकाताने दिलेले 154 धावांचे आव्‍हान बंगळुरूने 17.3 षटकांत पूर्ण केले. कर्णधार विराट कोहली 35 धावा (27 चेंडू, 4 चौकार आणि 2 षटकार), तसेच एबी डिव्हिलयर्स 22 (22 चेंडू, 2 चौकार आणि 1 षटकार) यांच्‍या फलंदाजीमुळे बंगळुरूला सहज विजय मिळवता आला. कोलकाता नाईट रायडर्सकडून रेयॉन मॅक्‍लरेनने 1 आणि लक्ष्‍मीपती बालाजीने 1 गडी टिपला.


तत्‍पूर्वी, 154 धावांचे आव्‍हान घेऊन मैदानात उतरलेल्‍या बंगळुरूच्‍या मयांक अग्रवालला लवकर टिपण्‍यास कोलकाताला लवकर यश आले. मॅक्‍लरेनने त्‍याला 6 धावांवर बाद केले. त्‍यानंतर फलंदाजीस आलेल्‍या कर्णधार विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, फटकवण्‍याच्‍या नादात बालाजीच्‍या चेंडूवर मॉर्गनच्‍या हाती झेल देऊन तो तंबूत परतला.

षटकारांचा पाऊस

बंगळुरूच्‍या फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा अक्षरश: पाऊस पाडला. ख्रिस गेल तर कमालीचा आक्रमक दिसला. त्‍याने तब्‍बल 9 षटकार आणि 4 चौकारांची आतषबाजी केली. त्‍याच्‍यापाठोपाठ कर्णधार कोहली 2 आणि डिव्हिलयर्सने 1 षटकार ठोकला.

कोलकाता नाईट रायडर्सच्‍या डावाविषयी जाणून घेण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...