आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolkata Knight Riders Won The Toss And Elected To Field

राजस्‍थान रॉयल्‍सचा गतविजेत्‍या कोलकात्‍यावर दमदार विजय, मॉर्गनचे अर्धशतक व्‍यर्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- ब्रेड हॉजच्या (नाबाद 46) शानदार फलंदाजीनंतर सिद्धार्थ त्रिवेदी (3/23) आणि कुपर (3/15) यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने कोलकता नाइट रायडर्सला 19 धावांनी हरवले. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राहुल द्रविडचे कुशल नेतृत्वसुद्धा विजयाला कारणीभूत ठरले.
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 144 धावा काढल्या. प्रत्युत्तरात केकेआरच्या फलंदाजांना 19 षटकांत सर्वबाद 125 धावाच काढता आल्या.

इयोन मोर्गनची अपयशी झुंज
धावांचा पाठलाग करताना केकेआरकडून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू इयोन मोर्गनने अर्धशतक झळकावताना सर्वाधिक 51 धावा काढल्या. त्याच्याशिवाय कर्णधार गौतम गंभीरने 22, मनोज तिवारीने 14 तर रजत भाटियाने 12 धावा काढल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. बिस्ला (1), जॅक कॅलिस (0), युसूफ पठाण (0) आणि लक्ष्मीरतन शुक्ला (2) यांनी मैदानावर फक्त हजेरी लावण्याचे काम केले.

द्रविड-रहाणेने सावरला डाव
अजिंक्य रहाणे व कर्णधार राहुल द्रविडने (17) टीमचा डाव सावरला. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली. संघाची धावसंख्या 46 असताना द्रविड बाद झाला. त्यानंतर आलेल्या स्टुअर्ट बिन्नीने 14 धावा काढल्या.

हॉजची वेगवान फलंदाजी
पाचव्या क्रमांकावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या हॉजने वेगवान फलंदाजी करून संघाला 144 धावांचा सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला. त्याने रहाणेसोबत चौथ्या गड्यासाठी 38 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या याग्निकसोबतही हॉजने सहाव्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. हॉजने अवघ्या 31 चेंडूंचा सामना करताना नाबाद 46 धावा काढल्या. या खेळीत त्याने 7 तडाखेबंद चौकार मारले.