आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolkata To Bowl First In Must Win Game Against Bengaluru

IPL: कोलकात्‍याचा बलाढ्य बंगळुरुवर 5 विकेट्स राखून विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- खराब सुरुवातीनंतर कोलकाता नाईट रायडर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 5 विकेट्सने विजय मिळविला. लागोपाठच्‍या दोन षटकांमध्‍ये दोन फलंदाज बाद झाल्‍यामुळे कोलकात्‍यावर दडपण आले होते. परंतु, टेन डोईशे यांनी अखेरच्‍या षटकात विजयावर शिक्‍कामोर्तब केले.

कोलकात्‍याची सुरुवात खराब झाली. रवी रामपॉलने मनविंदर बिसलाला पहिल्‍याच षटकात शुन्‍यावर बाद केले. मोझेस हेन्रिक्‍सने पॉईंटवर त्‍याचा झेल घेतला. त्‍यानंतर कर्णधार गौतम गंभीर आणि जॅक कॅलिस जोडीने दुस-या विकेटसाठी 31 धावा जोडल्‍या. गौतम गंभीर चांगला खेळत होता. परंतु, तो एक चुकीचा फटका मारून 14 धावांवर बाद झाला. त्‍यानंतर धोकादायक युसुफ पठाणला मुरली कार्तिकने 18 धावांवर पायचीत केले. त्‍यावेळी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला होता. परंतु, अनुभवी कॅलिसने मनोज तिवारीसोबत डाव सावरला. कॅलिस 45 चेंडुंमध्‍ये 41 धावा काढून बाद झाला. तर पुढच्‍याच षटकात तिवारी 24 धावांवर परतला. विनयकुमारने त्‍याला बाद केले. त्‍यावेळी कोलकात्‍यावर दडपण आले होते. परंतु, डोईशेने दोन चौकार ठोकून विजय साकारला.