आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolkata To Bowl First In Must Win Game Against Bengaluru

केकेआरमुळे बंगळुरूअडचणीत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - गेलच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर स्पर्धेत धडाक्यात प्रारंभ करणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम आता संकटात सापडली आहे. गौतम गंभीरला मागच्या सामन्यात खुन्नस देणार्‍या कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सला रविवारी केकेआरने 5 विकेटने नमवले. प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झालेल्या कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अडचणी वाढवल्या आहेत.

आयपीएल-6 च्या लीगमध्ये बंगळुरूचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. आता प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी बंगळुरूला उर्वरित दोन्ही लढती जिंकणे आवश्यक आहे. दोनपैकी एक जरी सामना बंगळुुरूने गमावला तर प्ले ऑफमधील त्याचा प्रवेश रनरेट आणि जरतरच्या चक्रात अडकू शकतो.

केकेआरच्या विजयाचे शिल्पकार सुनील नारायण (22 धावांत 4 विकेट) आणि जॅक कॅलिस (2/17 आणि 41 धावा) ठरले. या दोघांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसारख्या खतरनाक टीमला अवघ्या 115 धावांवर रोखले. यानंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 116 धावा काढून सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.

सहाव्या षटकात पहिला चौकार
बंगळुरूच्या फलंदाजीच्या वेळी त्यांचा पहिला चौकार तब्बल सहाव्या षटकात मारण्यात आला. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने हा चौकार मारला. पॉवर प्ले (6 षटके) संपला त्या वेळी बंगळुरूच्या खात्यात 1 विकेट आणि 22 धावा होत्या.