आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolkata Win, Yusuf Half Century In 15 Balls, IPL 7

युसूफचा झंझावात; कोलकाता विजयी, युसूफचे 15 चेंडूंत वादळी अर्धशतक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल-7 मध्ये शनिवारी रात्री सनरायझर्स हैदराबादचा चार गड्यांनी पराभव केला. युसूफ पठाणच्या (22 चेंडूंत 72 धावा) झंझावाती फलंदाजीच्या जोरावर केकेआरने 14.2 षटकांत सामना जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने सात बाद 160 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने सहा गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करणार्‍या केकेआरकडून गौतम गंभीर (28) व रॉबिन उथप्पा (41) यांनी 43 धावांची भागीदारी केली. त्यानंतर युसूफ पठाणने हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. त्याने 15 चेंडूूंत 50 धावा काढल्या.

तत्पूर्वी, हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर चार धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर नमन ओझा (26) व शिखर धवन (29) यांनी दुसर्‍या गड्यासाठी 64 धावांची भागीदारी केली. डोश्चेने ओझाला बाद केले. वेणुगोपाल 27 व डॅरेन सॅमीने 29 धावांचे योगदान दिले. मोर्कल, विनयकुमार, डोश्चे व शाकीबने प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : हैदराबाद : 7 बाद 160, कोलकाता : 6 बाद 161.