आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kotla 4th Test Match, India Wants Clean Sweep To Oz

कोटलावर ‘क्लीन स्वीप’ देण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्याला फिरोजशहा कोटलाच्या मैदानावर 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. मालिकेत 3-0 ने आघाडी घेतल्यानंतर आता कोटलावर पाहुण्यांना क्लिनस्वीप देण्याचे टीम इंडियाचे प्रयत्न असेल.

कोटलाची खेळपट्टी कोरडी आणि भेगा असणारी आहे. ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदतगार असेल. येथे भारतीय फिरकीपटू कमाल करू शकतात. भारतीय फिरकीपटंच्या बळावर टीम इंडिया येथे ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिका 4-0 ने जिंकू शकतो.

नऊ सामन्यांत मिळाला विजय-1987 मध्ये विंडीजकडून पराभूत झाल्यानंतर या मैदानावर भारताने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. त्यानंतर झालेल्या 10 पैकी 9 सामन्यांत भारताने विजयश्री मिळवली. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच येथे एक सामना झाला होता. ती लढत अनिर्णीत राहिली.

दोन्ही देशांदरम्यान सातवा सामना- या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 मार्चपासून सातवा सामना खेळवला जाईल. येथे भारताने दोन वेळा कांगारूंविरुद्ध विजय मिळवला.

भारतासाठी कोटला लकी- कोटलाचे मैदान मागच्या 27 वर्षांत भारतासाठी लकी ठरले आहे. कारण या काळात येथे झालेल्या 9 सामन्यांपैकी भारताने एकही लढत गमावली नाही. कोटलावर अखेरीस 29 नोव्हेंबर 1987 मध्ये भारताचा पराभव झाला होता.