पुनियाने पटकावले सुवर्णपदक / पुनियाने पटकावले सुवर्णपदक

वृत्तसंस्था

Aug 15,2011 06:26:05 AM IST

दिल्ली. गुडघ्याच्या गंभीर दुखापतीतून नुकत्याच सावरलेल्या कॉमनवेल्थ गेम्समधील पदक विजेत्या भारताच्या कृष्णा पुनियाने ५८.८८ मीटर थाळीफेकीची खेळी करत अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. पोर्टलँडमध्ये सुरू असलेल्या वार्षिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत थाळीफेकमध्ये कृष्णा पुनियाने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या वेळी पुनियाने ४ वेळा थाळीफेक केली. यामध्ये पुनियाने पहिल्या दोन राऊंडमध्ये ५७.६१ आणि ५७.०० मीटर अंतरावर थाळीफेक केली. त्यानंतर आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावत पुनियाने ५८.८८ मीटरच्या अंतरावर झेप घेऊन सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.

X
COMMENT