आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumar Sangakkara Breaks Sachin Tendulkar's Record

कुमार संगकारा @ १२,००० : न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पाच धावा काढून नवा विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन - श्रीलंकेच्या कुमार संगकाराने कसोटीतील १२ हजार धावांसह फलंदाजाच्या एलिट क्लबमध्ये प्रवेश केला आहे. अशा प्रकारचे यश संपादन करणारा तो जगातील पाचवा फलंदाज ठरला. त्याने शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध पाच धावा काढून १२ हजारांच्या आकड्याला यशस्वीपणे गवसणी घातली. यात सचिन तेंडुलकर १५,९२१ धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ रिकी पाँटिंग दुसर्‍या स्थानावर आहे. तसेच जॅक कॅलिस तिसर्‍या व राहुल द्रविड चौथ्या स्थानावर आहेत.

श्रीलंकेच्या ३७ वर्षीय संगकाराने २००० मध्ये कसोटी करिअरला प्रारंभ केला. यासह त्याने १३० कसोटीत श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व करताना १२००० धावांचा पल्ला गाठला. यात ३७ शतकांचा समावेश आहे. त्याने ३१९ धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. बांगलादेशविरुद्ध कसोटीत त्याला ही कामगिरी आपल्या नावे नोंदवता आली.

पहिल्याच दिवशी १५ विकेट
न्यूझीलंड व श्रीलंका दुसर्‍या कसोटीचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. पहिल्याच दिवशी १५ विकेट पडल्या. यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पहिला डाव २२१ धावांत गुंडाळला. नुवान प्रदीप (४/६३), सुरंगा लकमल (३/७१), प्रसाद (२/५०) आणि मॅथ्यूज (१/२९) यांनी शानदार गोलंदाजी केली. तसेच न्यूझीलंडकडून डग ब्रेसवेल (३/२३०,
बोल्ट (१/१८), साउदी (१/३०) चमकले.