आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumar Sangakkara Hits 300 Runs In Bangladesh Test News In Marathi

संगकाराने झळकावले त्रिशतक, तोडले ब्रायन लाराचे रेकॉर्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चटगाव: चटगाव येथे सुरु असलेल्‍या श्रीलंका विरुध्‍द बांगलादेश कसोटीमध्‍ये श्रीलंकेच्‍या कुमार संगकाराने त्रिशतक झळकावले आहे. या त्रिशतकाबरोबरच त्‍याने तीन जागतिक रेकॉर्ड आपल्‍या नावावर केले आहेत.

संगकाराने विरेंद्र सेहवागपेक्षाही तुफानी फलंदाजी करत आपले त्रिशतक पूर्ण केले आहे. शाकिब अल हसनच्‍या षटकामध्‍ये त्‍याने सलग चार चौकार आणि दोन षटकार खेचत 300 ची धावसंख्‍या पूर्ण केली.

संगकाराने 482 चेंडूंचा सामना कराताना 319 धावा केल्‍या. त्‍यामध्‍ये 32 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. 157 व्‍या षटकात नासिर हुसेनच्‍या गोलंदाजीवर सोहाग गाझीने त्‍याचा झेल टिपला. त्‍याच्‍या अप्रतिम खेळीमुळे श्रीलंकेने 587 धावांचा डोंगर उभा केला. या खेळीतच तो 11 हजार धावा कराणारा 9 वा फलंदाज ठरला.

श्रीलंकेने 248 धावांनी पहिला डाव जिंकल्‍यानंतर दुस-या डावात टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. संगकाराने त्रिशतक ठोकून 9 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड तोडले.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, संगकाराने तोडलेले रेकॉर्ड...