आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्स्टन दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षकपद सोडणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतानंतर दक्षिण आफ्रिकेला कसोटी क्रिकेटच्या अव्वल स्थानावर नेणारे क्रिकेट प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी येत्या ऑगस्टनंतर कौटुंबिक कारणास्तव प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात गॅरी कर्स्टन यांच्या दक्षिण आफ्रिका संघाच्या प्रशिक्षकपदाचा करार संपुष्टात येत आहे. कराराचे नूतनीकरण करू नये, असा संदेश कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाला दिल्याचे कळते. कुटुंबीयांसाठी अधिक वेळ देता यावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डानेही गॅरी कर्स्टन यांचे आभार मानले असून कुटुंबीयांसाठी वेळ मिळावा यासाठी कर्स्टन यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर आणि सन्मान केला आहे.