आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • La League News In Marathi, Divya Marathi, Brazil, Nayamer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ला लीग : नेमार, मेसीचा धमाका; बार्सिलोना ५-० ने विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार (३४ मि.) आणि लियोनेल मेसी (७७ मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर बार्सिलोनाने ला लीगमध्ये एकतर्फी विजय संपादन केला. या संघाने लढतीत लेवांटे युडीवर ५-० अशा फरकाने मात केली. राकिटिक (५७ मि.), रामिरेझ (५७ मि.) आणि पेड्रो (६४ मि.) यांनीही संघाच्या विजयात प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले. लेवांटे संघाला शेवटच्या मिनिटांपर्यंत सामन्यात गोलचे खाते उघडता आले नाही.

नेमारने बार्सिगोनाला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे या संघाला ३४ व्या मिनिटाला लढतीत १-० ने आघाडी घेता आली. त्यापाठाेपाठ अवघ्या दहा मिनिटांत राकिटिकने संघाच्या आघाडीला २-० ने मजबूत केले. या गोलच्या बळावर बार्सिगोनाने मध्यंतरापूर्वीच लढतीत आघाडी घेतली होती. दुस-या हाफमध्ये रामिरेझ, पेड्रो आणि मेसीने गोलचा धमाका उडवून बार्सिलोनाचा एकतर्फी विजय निश्चित केला.

सेव्हिलाची आगेकूच
सेव्हिलाने ला लीगमध्ये शानदार विजयासह आगेकूच केली. या संघाने लढतीत कोर्बोडाचा ३-१ अशा फरकाने पराभव केला. बस्सा (८, ८८ मि.) आणि एमबिया (७२ मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर सेव्हिलाने सामना जिंकला. गार्सियाने रंगतदार लढतीत काेर्बाेडा संघासाठी एकमेव गोल केला.