आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ला लीग : सोसायदादचा ‘रिअल’ विजय; माद्रिदला चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - लालीग फुटबॉल स्पर्धेत सोसायदादने खळबळजनक विजयाची नोंद केली. ०-२ अशा पिछाडीनंतरही बलाढ्य रिअल माद्रिदला ४-२ ने चिरडले. दुसरीकडे बार्सिलोना विजयरथावर आरूढ आहे. त्यांनी व्हिल्लारियलचा विरुद्ध ने धुव्वा उडवला. सँड्रो रामीरेझने हा पहिलाच विजयी गोल केला.

जखमी रोनाल्डोशिवाय खेळणाऱ्या माद्रिदला उत्तरार्धात त्याची उणीव भासली. त्याशिवाय अँजेल डी मारिया आणि झाबी अलोन्सो नसल्यामुळे त्यांची बाजू लंगडी पडली. असे असले तरी माद्रिदने पहिल्यांदा धडाकेबाज आक्रमण करून पहिल्या १० मिनिटांतच २-० अशी जोरदार आघाडी घेतली होती. सर्जिओ रामोस आणि गॅरेथ बेलने हे दणकेबाज गोल केले. त्यानंतर त्यांचा खेळ सुमार होत गेला. सोसायदादच्या इनिगो मार्टिनेझ आणि डेव्हिड झुरुटुझाने गोल करून सर्वप्रथम बरोबरी साधून दिली. त्यानंतर पुन्हा झुरुटुझा आणि कार्लोस व्हेलाने दणादण गोल करून माद्रिदला पराभव पाहायला लावला.
रामीरेझला गगन ठेंगणे
बार्सिलोनाच्यासँड्रो रामीरेझसाठी व्हिल्लारियलविरुद्धचा सामना संस्मरणीय ठरला. त्याच्या पहिल्यावहिल्या गोलने बर्साला विजयाचे दार खुले केले. १९ वर्षीय रामीरेझने शेवटच्या आठ मिनिटे शिल्लक असताना हा गोल करून विजय साजरा केला. जोडीला मेसी नेमारच्या पदलालित्यानेही व्हिल्लारियलला नाचवले.

छायाचित्र - चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी बार्सिलोनाचा मेसी व्हिल्लारियलच्या अल्बिनेत रंगलेली चुरस.