आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • La Liga: Barcelona Loses To Granada News In Divya Marathi

ग्रॅनाडा विजयी; बार्सिलोनाच्या आशा टांगणीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - ला लीग स्पर्धेचे दावेदार समजल्या जाणार्‍या बार्सिलोनासारख्या संघाला मानांकन नसलेल्या ग्रॅनाडा संघाकडून 1 - 0 असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे बार्सिलोनाला ला लीगमधूनही बाहेर पडावे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अल्जेरियाचा स्टार फुटबॉलपटू यासीन ब्राहिमी याने उत्तरार्धात सोळाव्या मिनिटाला केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. त्यामुळेच बार्सिलोनासारख्या संघावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात चॅम्पियन्स लीगमध्ये अ‍ॅटलेटिको माद्रिदने बार्सिलोनाला पराभूत केल्याने त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले होते. मेस्सी व बेल असूनही बार्सिलोनाला मानहानीकारक पराभव सहन करावा लागला.

केवळ गोलच होत नव्हते
या पराभवामुळे आम्ही एक पाऊल मागे गेलो. संपूर्ण सामन्यावर आमचे नियंत्रण होते. मात्र गोल करणे जमले नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा काहीही सांगणे अयोग्य असते. आम्ही गोल करण्याचे केलेले प्रयत्न अपयशी ठरले. - अ‍ॅँद्रेस इनिस्ता, बार्सिलोनाचा मिडफिल्डर

29 प्रयत्न निष्फळ ठरले
खेळाडूंनी सामन्यात 80 टक्के वेळ चेंडूवर नियंत्रण राखले. यापेक्षा अधिक खेळाडूंकडून अपेक्षाच करू शकत नाही. त्यातही 29 वेळा गोलपोस्टपर्यंत केलेली निष्फळ ठरलेली आक्रमणे हे दुर्दैवच. - गेरार्डो मार्टिनो, प्रशिक्षक, बार्सिलोना