आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयबीएलचे रंगारंग उद्घाटन; मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल) चे उद्घाटन शानदार झाले. मात्र, आयबीएलला प्रेक्षकांना खेचता आले नाही. बुधवारी पहिल्या दिवशी बहुतेक स्टँड रिकामे होते. डीडीएच्या जवळपास 4000 क्षमता असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये एक हजार प्रेक्षकसुद्धा उपस्थित नव्हते.

डीडीए बॅडमिंटन अँड स्क्वॉश स्टेडियममध्ये विदेशी कलाकारांनी शानदार कार्यक्रम सादर केले. सायं. 6.30 वाजता नियोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला 7 वाजता सुरुवात झाली. अध्र्या तासाच्या कार्यक्रमात कलाकारांनी सर्व सहा संघांचे बॅनर झळकवले. तत्पूर्वी आयबीएलच्या सर्व सहा संघांना शपथ देण्यात आली. सायना नेहवालने ही शपथ दिली


दिल्ली स्मॅशर्सची विजयी सुरुवात
आयबीएलच्या रंगारंग उद्घाटनानंतर स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दिल्ली स्मॅशर्सच्या साईप्रणीतने विश्व चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता खेळाडू तेन मेन नुगेनला पराभूत करून धक्कादायक विजय मिळवला. प्रणीतने पुणे पिस्टन्सच्या तेन मेनला 21-16, 21-20 ने हरवले.

ज्युलियन शेंकमुळे बरोबरी
महिला एकेरीत पुणे पिस्टन्सच्या ज्युलियन शेंकने स्मॅशर्सच्या जिंदापोन नाचाओनला 21-15, 21-6 ने पराभूत करून संघाला बरोबरी मिळवून दिली.

दिल्लीची 2-1 ने आघाडी
पुरुष दुहेरीत बुन होंग तेन आणि केन किट कू यांनी रूपेशकुमार आणि सनावे थॉमस यांच्यावर 21-13, 21-16 ने मात करून दिल्ली स्मॅशर्सला पुणे पिस्टन्सवर 2-1 ने आघाडी मिळवून दिली.