आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स लीग टी-२० : लाहोर लायन्सची मुंबई इंडियन्सवर मात , उमर अकमल सामनावीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - नसीर जमशेद (२६) व अहेमद शहजाद (३४) या सलामीवर जोडीची अर्धशतकी भागीदारी आणि उमर अकमलच्या नाबाद ३८ धावांच्या बळावर लाहोर लायन्सने मुंबई इंडियन्सचा चॅम्पियन लीग टी-२० स्पर्धेच्या पात्रता फेरीत ६ गडी राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ७ बाद १३५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात लाहोरने १८.४ षटकांत ४ बाद १३९ धावा काढल्या. यात मोहंमद हाफिज १८, सईद नसीमने ६ आणि आसिफ रझाने नाबाद १४ धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लिंडसे सिमोन्स ७ धावांवर बाद झाला. दुसरा सलामीवीर माइक हसीने २८ धावा जोडल्या. मधल्या फळीतील भरवशाचे फलंदाज जलज सक्सेना (०), अंबाती रायडू (३) व केरॉन पोलार्ड (६) यांनी निराश केले. कर्णधार हरभजनसिंगने १८ धावा केल्या. प्रवीण कुमार २० व लसिथ मलिंगा एका धावेवर नाबाद राहिला. लाहोरकडून अजीज चिमाने व वाहेब रियाजने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्‍स : २० षटकांत ७ बाद १३५. (आदित्य तारे ३७, माइक हसी २८ धावा. अजीज चिमा २/२२).
लाहोर लायन्स : १८.४ षटकांत ४ बाद १३९. (शहजाद ३४, जमशेद २६ धावा. प्रज्ञान ओझा २/१८).
नॉर्दर्न नाइट्सची विजयी सलामी
डॅनियलच्या नेतृत्वाखाली नॉर्दर्न नाइट्सने चॅम्पियन लीग टी-२० स्पर्धेच्या पात्रता फेरीत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडच्या या संघाने शनिवारी श्रीलंकेच्या सदर्न एक्स्प्रेसवर सात गड्यांनी मात केली. केन विलियमसनच्या (५२) अर्धशतकाच्या बळावर नॉर्दर्न नाइट्सने ९.३ षटकांत सामना जिंकला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी दहा षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना सदर्न एक्स्प्रेसने ५ गड्यांच्या माेबदल्यात ९२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात नॉर्दर्नने सात गडी राखून लक्ष्य गाठले.