आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात क्रिकेटला वेगळी ओळख निर्माण करून देणा-या ललित मोदींवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे. आयपीएलचे संस्थापक ललित मोदींना आता क्रिकेटशी कुठल्याच प्रकारचे नाते ठेवता येणार नाही.
आर्थिक अनियमततेचा आरोप ठेवत बीसीसीआयने आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदींवर आजीवन बंदी घातली आहे. बोर्डाने जरी मोदींवर बंदी घातली असली तरी भ्रष्ट संस्थेविरोधात आपली लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, 'आज नाही तर उद्या बीसीसीआयचे सर्व कारनामे जगसमोर येतील. मी त्यांना सोडणार नाही.'
क्रिकेटला घरा-घरांत पोहोचवण्याचे मोदींनी फक्त स्वप्नच पाहिले नाही तर आयपीएलच्या रूपांत ते प्रत्यक्षातही उतरवले. आयुष्यात त्यांनी जे जे ठरवले होते. ते साध्य करूनच दाखवले. टी-20 क्रिकेटला ग्लॅमरस स्वरूप आणणा-या आयपीएलशी मोदींच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. पहिल्या लिलावापासून ते पहिल्या ओपनिंग सेरेमनीपर्यंत, दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजन करण्यापासून ते चॅम्पियन्स लीग टी-20चा फॉरमॅट जगासमोर ठेवण्यापर्यंत अनेक कारनामे केले आहेत.
पुढच्या स्लाईडला क्लिक करून पाहा, ललित मोदींचे आयपीएलमधील स्मरणीय क्षण...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.