आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalit Modi Back On Cricket Pitch News In Marathi

क्रिकेट पॉलिटिक्समध्ये मुरलेले खेळाडू आहेत ललित मोदी, बघा सेलिब्रिटींसोबतचे PHOTOS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन प्रिमियर लीगचा पाया रचणाऱ्या ललित मोदी यांचे क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे. प्रचंड वादानंतर ते राजस्थान क्रिकेट असोसिएशमचे अध्यक्ष निवडून आले आहेत. प्रारंभी त्यांच्या विरोधकांनी सुप्रीम कोर्टात खटला दाखल करून त्यांना आयपीएलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
ललित मोदी आणि क्रिकेट पॉलिटिक्सचे जुने नाते आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचा कायपालट करण्यासह देशाला आयपीएलच्या रुपाने उत्कृष्ठ क्रिकेट स्पर्धा देण्यात मोदींनी मोलाची भूमिका बजावली आहे.
आयपीएलला कायम भ्रष्टाचाराशी जोडले जाते. परंतु, आयपीएल नसते तर प्रवीण तांबे याच्यासारखा ज्येष्ठ खेळाडू आता कुटुंबीयांसोबत खेळाचा आनंद घेताना दिसला असता. 40 प्लस असतानाही त्याने अनेक सामन्यांमध्ये विजयश्री खेचून आणला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात त्याने केवळ दोन बॉलमध्ये तीन विकेट घेतल्या.
ललित मोदी यांचा क्रिकेट पॉलिटिक्ससोबत असलेला संबंध
- 1999 मध्ये मोदी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनमध्ये आले. तेव्हा हिमाचलजवळ एकही क्रिकेट स्टेडिअम नव्हते. मोदींनी आश्वासन दिले, की लवकरच ते हिमाचलला क्रिकेट स्टेडिअम देतील. त्यांनी आपले हे आश्वासन पूर्ण केले.
- 2005 मध्ये मोदी राजस्थान क्रिकेट असोसिएशनमध्ये सामिल झाले. त्यावेळी ते नागोर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत होते.
- याच वर्षी ते राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले. याच्या बळावर त्यांनी बीसीसीआयमध्ये प्रवेश केला.
- याच वर्षी त्यांनी जगमोहन दालमिया यांना हरविण्यासाठी शरद पवार यांची मदत केली. त्यामुळे त्यांना बीसीसीआयचे उपाध्यक्ष करण्यात आले.
- त्यानंतर बीसीसीआयचे उत्पन्न कैकपटीने वाढले. 2005 ते 2008 या कालावधीत उत्पन्न तब्बल 1 बिलियन लॉडरपेक्षा जास्त झाले.
- 2008 मध्ये मोदींनी आयपीएलचे पाया रचला. त्यांनी बॉक्सिंग प्रमोटर डॉन किंग स्टाईलने क्रिकेटला व्यापारी दर्जा दिला. यामुळे युवा खेळाडूंची आर्थिक स्थिती सुधारली. या स्पर्धेमुळे भारतीय संघाला युसूफ पठाण आणि रविंद्र जडेजा सारखे प्रतिभावंत खेळाडू मिळले.
पुढील स्लाईडवर बघा, ललित मोदी यांचे सेलिब्रिटींसोबतची छायाचित्रे....