आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदी भारतात परतणार; पारपत्र पुन्हा प्रस्थापित होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांचे पारपत्र (पासपोर्ट) पुन्हा प्रस्थापित करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज दिले. या आदेशाद्वारे यासंदर्भातील याआधीचे सर्व आदेश रद्दबातल झाले आहेत. त्यामुळे ललित मोदी यांचा भारतातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मार्च २०११ मध्ये मुंबई विभागीय पारपत्र कार्यालयाने ललित मोदी यांचे पारपत्र रद्द केले होते. तेव्हापासून ललित मोदी यांचे वास्तव्य ब्रिटनमध्येच आहे. दरम्यान, ललित मोदी यांनी ब्रिटनमध्ये राहूनच राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. मात्र, बीसीसीआयने त्यांना आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनलाही बडतर्फ केले होते. इंग्लंडहून प्रतिक्रिया देताना ललित मोदी यांनी म्हटले आहे, मी आपल्या न्यायसंस्थेवर कायम विश्वास ठेवला. अखेर मला न्याय मिळाला. मी भारतात परतण्यास उत्सुक असून बीसीसीआयविरूद्ध लढा सुरूच ठेवणार.