आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षात बदलला ललित मोदीचा मुलगा, फरारी ते जेटपर्यंत अशी आहे LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनमध्ये राहत असलेला रुचिर हा ललित आणि मीनल मोदीचा मुलगा आहे. - Divya Marathi
लंडनमध्ये राहत असलेला रुचिर हा ललित आणि मीनल मोदीचा मुलगा आहे.
स्पोर्टस डेस्क- राजस्थान क्रिकेट संघटनेचा मोह सूटत नसलेल्या आयपीएलचे माजी चेयरमन आणि राजस्थान क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ललित मोदीचा मुलगा रुचिर याची राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए)ची एंट्री झाली आहे. क्रिकेटशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, ललित मोदी रुचिरला आरसीएचे नवा अध्यक्ष बनवू शकतात. आरसीएची निवडणूक झाली आहे व तेथील निकाल अद्याप जाहीर झाला नाही. याबाबत सांगितले जात आहे की, आरसीएची निवडणूक लढविण्यासाठी रूचिरच्या नावावर अलवरमध्ये जमिन खरेदी केली आहे. आयपीएलमध्ये सेलिब्रेटिजसमवेत चमकणा-या रूचिरची लाईफ (भारतातून लंडनमध्ये शिफ्ट झाल्यानंतर) मागील पाच-सहा वर्षात खूपच बदलली आहे. प्रायवेट जेट आणि लग्झरी कार्स अशी आहे रुचिरची लाईफ...
- सन 2008 ते 2010 या काळात आयपीएल सामन्यात व त्यानंतर होणा-या पार्ट्यात रूचिर पित्यासमवेत दिसायचा.
- त्यावेळी तो अनेक सेलिब्रेटिज आणि बड्या क्रिकेटर्ससमवेत दिसायचा.
- मात्र, नंतरच्या काळात क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून ललित मोदीला आयपीएलमधून निलंबित केले.
- रूचिर सध्या पिता ललित आणि आई मीनलसह लंडनमध्ये राहत आहे.
- त्याने नुकतेच लंडनमधील एका बिजनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे. जेथे त्याने बिजनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली.
- यानंतर खुद्द ललित मोदींनी ट्वीट करून सर्वांना माहिती दिली होती. रुचिर मोदी सध्या वेन्चर नावाची कंपनी सांभाळत आहे.
- यापूर्वी तो आपल्या वडिलांसमवेत आयपीएलच्या मॅचमध्ये व पार्ट्यामध्ये दिसून यायचा.
- यासोबतच रुचिर सोशल मीडियात खूपच अॅक्टिव राहतो. तो अनेकदा पार्टीज आणि कॉलेज लाईफचे फोटो शेअर करतो.
- या फोटोजमध्ये तो फरारी सारख्या लग्झरी कार्स आणि प्रायवेट जेटमध्ये फिरताना दिसतो. त्याच्यासमवेत त्याचे मित्र- मैत्रिणीही दिसून येतात.
- ललित मोदींसमवेत अनेक इव्हेंटमध्ये दिसून येतो.
याआधीची चर्चेत राहिलाय-
- प्रकरण 2010 मधील आयपीएल 3 दरम्यानचे आहे. जेव्हा रुचिर मोदी आपल्यासोबत प्रायवेट सिक्युरिटी गार्ड्स घेऊन चालला होता.
- एक दिवस मुंबईत लोअर परेल भागात त्याच्या गाडीचा ताफा रस्त्याने जात होता तर तेथे ट्राफिक जाम झाले.
- लोकांना वाटले कोणी एखादा मंत्र्यांचा मुलगा असेल त्यामुळे एवढा मोठा ताफा असेल. मात्र नंतर कळले की हा ललित मोदींचा मुलगा आहे.
- जेव्हा ही माहिती मिडियाला पोहचली तेव्हा मुंबई पोलिसांवर ललित मोदी व त्याच्या मुलाला इतकी सुरक्षा देण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.
- तेव्हा मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांनी याचे समर्थन करीत, ललित मोदी व त्याच्या परिवाराला असलेल्या धोक्यामुळे ही सुरक्षा दिल्याचे फुटकळ कारण दिले होते.
- ललित मोदीने अॅक्टर रॉनित रॉयच्या सिक्युरिटी एजेन्सीकडून अनेक प्रायवेट सिक्युरिटी गार्ड हायर केले होते.
- जे पोलिसांच्या जवानांसमवेत मोदी परिवाराला सुरक्ष देत असत व झेड प्लस सिक्युरिटी असते तशीच सुरक्षा पुरवत.
लंडनमध्ये आहेत अनेक लग्झरी कार्स-
- ललित मोदी अनेक लग्झरी कारचा मालक आहे. रुचिर याच गाड्यात फिरताना दिसतो.
- त्याच्याजवळ लंडनमध्ये फिरायला फरारी कार आहे. ज्या नंबर प्लेटवर क्रिकेट लिहले आहे.
- मोदीने आपली पत्नी मीनलला काही वर्षापूर्वी एस्टन मार्टिन कार गिफ्ट केली होती.
- याशिवाय मोदीजवळ मर्सिडीज बेंजची जी 63 एएमजीसह अनेक लग्झरी कार्स आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, ललित मोदीचा मुलगा रूचिर कसा जगतो लग्झरी लाईफ....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...