आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lance Armstrong Stripped Of Olympic Bronze Medal

आर्मस्ट्राँगकडून ऑलिम्पिक कांस्यपदक काढून घेतले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- डोपिंगची स्पष्टोक्ती दिल्यानंतर अमेरिकेचा स्टार सायकलिंगपटू लान्स आर्मस्ट्राँगकडून 2000 सिडनी ऑलिम्पिकचे कांस्यपदक परत घेण्याचे आदेश देण्यात आले. यापूर्वी त्याच्याकडील टूर दी फ्रान्सचे सात किताब परत घेण्यात आले आहेत. ‘आर्मस्ट्राँगकडून सिडनी ऑलिम्पिकचे कांस्यपदक परत घेण्यात आले.

बंदी घातलेल्या औषधांचा वापर केल्याचे त्याने मान्य केले. आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियनने (यूसीआय) सातही किताब परत घेत आर्मस्ट्राँगवर आजीवन बंदी घातली होती,’ अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या एका अधिकार्‍याने दिली. अमेरिकेतील प्रस्तोता ओपरा विंफ्रे या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आर्मस्ट्राँगने डोपिंगचा गुन्हा मान्य केला. उत्तेजक द्रव्य घेत असल्याचे कबुल केले होते.