आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन - ब्रिटिश सरकारने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेच्या कडक सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यातील एका योजनेनुसार शहरातील अनेक घरांच्या छतावर जमिनीवरून हवेत मारा करणारे मिसाइल तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लंडनवासीयांना ही योजना पसंतीस पडलेली नाही. शहरात याला विरोध सुरू आहे. काही नागरिक तर याविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी करीत आहेत.
सहा साइट्स निवडल्या आहेत शासनाने - मिसाइल तैनात करण्यासाठी शासनाने सहा साइटस्ची निवड केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी सुरक्षेसाठी हवा, पाणी आणि जमीन अशा तिन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
गरज पडल्यास कायदेशीर कारवाई - हस्ताक्षर अभियानाचा शासनावर कोणताच परिणाम झाला नाही, तर गरज पडल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू, असे हस्ताक्षर अभियानचे ख्रिस नाइनहॅम यांनी म्हटले आहे.
लंडनवासीय काय म्हणतात?
मिसाइल तैनात न करतासुद्धा ऑलिम्पिकची सुरक्षा करता येणे शक्य आहे, असे ख्रिसचे म्हणणे आहे. खरे तर या मिसाइलचा लंडनवासीयांनाच अधिक धोका आहे. यांना उपयोगात आणण्याची गरज पडल्यास हे मिसाइल लंडनच्या अधिक लोकसंख्या असलेल्या भागातच कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे लंडनवासीयांनाच अधिक धोका आहे.
हस्ताक्षर अभियान
लंडनवासीयांनी या योजनेच्या विरोधात हस्ताक्षर अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत एक हजारापेक्षा अधिक लोकांनी यावर स्वाक्ष-या केल्या आहेत. दुसरीकडे सुरक्षा व्यवस्थेसंबंधी आम्ही कोणतीच तडजोड करू शकत नाही, असे सुरक्षा विभाग आणि मंत्रालयाने म्हटले आहे. स्पर्धेच्या काळात सर्वांची सुरक्षेला शासनाची प्राथमिकता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
ऑलिम्पिक अखेरचे काउंटडाऊन सुरू
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.