आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चेन्नई - येत्या 3 एप्रिलपासून सुरू होत असलेल्या ‘आयपीएल-6’मध्ये चेन्नईत होणा-या सामन्यांत श्रीलंकेचा एकही खेळाडू खेळणार नाही. राजकीय विरोधानंतर आयपीएलच्या प्रशासकीय परिषदेने हा निर्णय घेतल्याची माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली.
तत्पूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पत्र लिहिले होते. चेन्नईत होणा-या एकाही सामन्यात श्रीलंकेचे खेळाडू किंवा पंच असायला नकोत, अशी भूमिका त्यांनी पत्रात मांडली होती.
नऊ संघांत 13 खेळाडू : आयपीएलमध्ये सहभागी 9 संघांमध्ये श्रीलंकेचे 13 खेळाडू आहेत. नुवान कुलसेकरा आणि अकिला धनंजय हे दोघे तर स्थानिक चेन्नई सुपरकिंग्जचेच सदस्य आहेत. कुमार संगकारा सनराइज हैदराबाद आणि महेला जयवर्धने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार आहे. इतर खेळाडूंमध्ये मुथय्या मुरलीथरन, लसिथ मलिंगा, तिलकरत्ने दिलशान, जीवन मेंडिस, सचित्र सेनानायके, अजंथा मेंडिस, अँजेलो मॅथ्युज, कुशल परेरा आणि तिषारा परेरा यांचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.