आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिन तेंडुलकरपेक्षा लाराच सर्वश्रेष्ठ, पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीची मुक्ताफळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांच्या तुलनेत वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याचे मत पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले आहे. यासह आफ्रिदीने कोण सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे, या वादात उडी मारली आहे.

यासंदर्भात शाहिद आफ्रिदी म्हणाला, की सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉंटिंग यांच्या तुलनेत ब्रायन लारा मला जरा सरस वाटतो. माझ्या गेल्या १६ वर्षांच्या करिअरमध्ये मी बघितलेल्या फलंदाजांपैकी लारा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. मी गोलंदाजी केलेल्या फलंदाजांपैकी लाराला गोलंदाजी करताना मला दडपण येत होते. मी केलेल्या गोलंदाजीवर लारा सहज खेळू शकतो. फिरकी गोलंदाजांना तोंड देताना लाराची फलंदाजी बघण्यासारखी असते.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ आणि पाकिस्तानचा नवीन गोलंदाज महंमद आरिफ चांगले गोलंदाज असल्याचे मला वाटते, असेही आफ्रिदीने सांगितले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघात माझे नक्कीच पुनरागमन होईल, असा आशावादही त्याने व्यक्त केला आहे.