आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Largest Digital Photo Mosaic Of Sachin Tendulkar Unveiled

सचिनच्या सर्वात भव्य डिजिटल फोटोचे अनावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जपानची इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या तोशिबाने सचिनच्या सन्मानाप्रीत्यर्थ जगातील सगळ्यात मोठ्या डिजिटल फोटोची निर्मिती केली. सचिन तेंडुलकरच्या या फोटोचे अनावरण सचिनच्याच हस्ते करण्यात आले.

या भव्य चित्रात सचिनच्या 17 हजार चाहत्यांच्या छायाचित्रांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. माझा चेहरा तयार करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या चाहत्यांच्या चेहर्‍यांचा उपयोग करण्याची संकल्पनाच खूप भन्नाट असल्याने मला भावल्याचे सचिनने नमूद केले. माझे हे मोझाइक छायाचित्र इतक्या चाहत्यांच्या सहभागामुळे माझ्यासाठी अधिकच विशेष बनले असून मी चाहत्यांसह तोशिबा कंपनीचाही आभारी असल्याचे सचिनने म्हटले आहे.