आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिंगा...एकमेव शतकवीर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेच्या मलिंगाने 2011 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने 16 सामन्यांत एकूण 28 विकेट घेतल्या. याच वर्षी त्याने 13 धावा देताना पाच गडीही बाद केले होते. यासाठी त्याला 2011 मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज (पर्पल कॅप) पुरस्काराचा मानकरी ठरला होता. मलिंगा हा स्लॉग षटकांमध्ये रिव्हर्स स्विंगच्या साह्याने कमालीची गोलंदाजी करतो. मलिंगाने आतापर्यंत 2012 मध्ये 22 गडी बाद केले. 31 वर्षीय मलिंगाला आजही मॅच विनर खेळाडू म्हणून ओळखले जाते. इंडियन्सचा तो आधारस्तंभ आहे.

अमित मिश्रा शतकासमीप
आयपीएलमध्ये केवळ वेगवान गोलंदाजांचाच बोलबाला नाही. ओव्हरऑल टॉप-5 गोलंदाजांमध्ये दोन स्पिनरदेखील आहेत. हे दोघे (अमित मिश्रा, प्रज्ञान ओझा) भारतीय आहेत. 2008 पासून आजतागायत झालेल्या सहा सत्रांत श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना शंभरपेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावे 103 गडी बाद करण्याची नोंद आहे. तर लेग स्पिनर अमित मिश्रा 95 विकेटसह दुसर्‍या स्थानावर आहे. अमित हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याने तीन वेळा हॅट्ट्रिकचीही नोंद केली होती. योगायोगाने हे दोन्ही गोलंदाज नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये आपापल्या टीमकडून खेळले होते. आयपीएल-7 मध्ये मलिंगा मुंबई इंडियन्सचे आणि अमित मिश्रा हैदराबादचे प्रतिनिधित्व करणार आहे.

यांनीही घेतल्या 5-5 विकेट
आयपीएलमध्ये आतापर्यंत 11 खेळाडूंनी एका सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. यात जेस फ्युकनर हा एकमेव आहे, ज्याने दोन वेळा ही कामगिरी आपल्या नावे केली.

मिश्राच्या गुगलीसमोर अनेक दिग्गज ढेर
लेगस्पिनर अमित मिश्रा 2008 पासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याने डेअरडेव्हिल्सकडून खेळताना हॅट्ट्रिकही नोंदवली होती. त्याला सनरायझर्स हैदराबादने 4.75 कोटींमध्ये करारबद्ध केले.

पाच विकेट घेणारे गोलंदाज
1. लसिथ मलिंगा (5/13)
2. अमित मिश्रा (5/18)
3. हरभजनसिंग (5/18)
4. ईशांत शर्मा (5/12)
5. मुनाफ पटेल (5/21)
6. एल.बालाजी (5/24)
7. सुनील नरेन (5/19)
8. अनिल कुंबळे (5/5)
9. रवींद्र जडेजा (5/16)
10. जेम्स फ्युकनर (5/16)
11. जयदेव उनाडकत (5/25).