आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषकासाठी \'यार्कर किंग\' ने पास केली फिटनेस टेस्‍ट, चाहत्‍यांमध्‍ये उत्‍साह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज 'यार्कर किंग' लसिथ मलिंगाने फिटनेस टेस्‍ट पास केली असून शनिवारी न्यूझीलंडविरूद्ध होणा-या सामन्‍यात तो खेळणार असल्‍याचे त्‍याने पत्रकारांना सांगितले.
घोट्याच्या दुखापतीमुळे मलिंगा विश्‍वचषकात खेळणार की, नाही या‍बद्दल साशंकता होती. कित्‍येक चाहत्‍या त्‍याच्‍या तंदुरुस्‍तीसाठी देव पाण्‍यात टाकून बसले होते. मात्र, रविवारी मलिंगाने पत्रकारांना आपण फिटनेस टेस्‍ट पात्र झाल्‍याचे सांगणताच मलिंगा चाहत्‍यांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण आहे.
मलिंगाने फिटनेस टेस्ट पास केली असून तो शंभर टक्के फीट झाला आहे. त्‍यामुळे आमच्‍या संघाला बळकटी आल्‍याचे श्रीलंकेचा कर्णधार एंजलो मॅथ्यूज याने सांगितले .
काय म्‍हणाला मलिंगा
मी त्रास सहन करण्याची सवय करीत आहे. मला विश्‍वचषकात खेळायचे आहे.गतीबद्दल मी निश्चित नाही पण लय आणि रन अप चांगला आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विश्‍वचषक सामन्‍यांचे वेळापत्रक..